जगाला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेत हाहाकार, इराणकडून तब्बल 90 टक्के..
इराण आणि अमेरिका युद्धाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. मात्र, युद्ध काही थांबत नाही. यादरम्यानच आता इराणकडून करण्यात आलेल्या विधानाने जगात एकच हाहाकार उडाला. ज्याकरिता अमेरिकेने इतका मोठा हट्टहास केला, तेच घडले. जग विनाशाच्या तोंडावर आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्याचा निर्णय चुकल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक वर्षांपासून जी भीती वाट होती, ती भीती प्रत्यक्षात उतरल्याचे सांगितले जाते. इराणने एका अणु दुर्घटनेची पायाभरणी केली आहे. इराणने त्यांच्याकडील सर्व अणु साठे अमेरिकेकडे सोपवावी, अशी प्रमुख अटक अमेरिकेची असतानाच ही धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामध्येच अण्वस्त्रे विकसित करण्यास तयार असल्याचा स्पष्ट इशारा देऊन तेहरानने जगाची झोप उडवली. अमेरिकेला दिलेल्या शेवटच्या इशाऱ्यात इराणने मध्य-पूर्वेतील युद्धाचे मूळ कारण उघड केले आहे. हेच नाही तर इराणकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावरून हे स्पष्ट दिसते की, त्यांना अमेरिकेसोबतचे युद्ध संपवण्याची कोणतीही घाई नाही. मात्र, या युद्धामुळे इतर देशांची मोठी वाट लागलीये.
इराण आणि अमेरिका युद्धात सहभाग नसतानाही अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र, अमेरिकेसोबतचे युद्ध कितीही दिवस चालले तरीही आपल्याला ताण नसल्याने सांगतानाच इराण दिसला. इराणने ट्रम्प यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांच्यावर एकदा जरी हल्ला झाला, तर ते आपले युरेनियम 90 टक्क्यांपर्यंत शुद्ध करतील. याचा थेट अर्थ असा होतो की, अणुबॉम्ब होतो.
आता अमेरिका आणि इराण युद्ध फक्त धमक्यांपुरतेच मर्यादित राहिले नाही. इराणकडे अणु साठे आहेत. आता त्यांनी थेट धमकीच अमेरिकेसह जगाला दिली. इराणच्या या धमकीने जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, युरेनियमला 20 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत संवर्धित करणे हा सर्वात कठीण भाग आहे. 60 टक्क्याहून 90 टक्क्यापर्यंत पोहोचण्याकरिता फक्त काही दिवसांचा कालावधी लागतो.
इराणच्या संसदीय आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रझाई यांनी खळबळजनक खुलासा करत थेट म्हटले की, जर त्यांच्यावर आता एकदा जरी हल्ला झाला तर संसद तात्काळ कोणत्याही गोष्टीचा विचार न करता 90 टक्के संवर्धित करण्यास मंजुरी देईल. इराणच्या या विधानानंतर जग तणावात आहे. अमेरिकेला ज्याची भीती होती, ते झालेच आहे. अमेरिकेच्या चिंतेत मोठी वाढ झाल्याचे यावरून आता दिसत आहे.