AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनची मदत घेणार नाहीच.. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, इराणला थेट..

डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसीय चीन दाैऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच आता चीन दाैऱ्यावर निघण्यापूर्वी अत्यंत मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

चीनची मदत घेणार नाहीच.. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, इराणला थेट..
US President Donald Trump
| Updated on: May 13, 2026 | 7:58 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण जगाला देशोधडीला लावले. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत मोठा हल्ला केला. तेव्हापासूनच जग तणावात आहे. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या झळा पूर्ण जग सहन करत आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. परिस्थिती अधिक बिकड होत आहे. अनेक देशात कच्चे तेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे. थेट अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होत आहे. यादरम्यानच आज डोनाल्ड ट्रम्प हे चीन दाैऱ्यावर निघाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा तीन दिवसांचा चीन दाैरा आहे. मात्र, चीन दाैऱ्यावर निघण्यापूर्वीच मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. बीजिंगला रवाना होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धाबाबत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांना इराणसोबतचे युद्ध सोडण्याकरिता चीनची अजिबात गरज नाही. शी जिनपिंग यांची इराणसोबच्या युद्धात कोणतीही मदत घेणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दाैरा पूर्व नियोजित आहे. यादरम्यान पुन्हा एकदा इराणला चेतावणी देत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आता इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य रस्ता निवडावा लागेल. नाही तर त्यांना अत्यंत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, युक्रेन रशिया युद्ध लवकरच संपेल. डोनाल्ड ट्रम्प 13 मे ते 15 मे पर्यंत चीन दाैऱ्यावर असतील.

डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात महत्वाच्या मुद्द्यात चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्य देखील या दाैऱ्यावर आहेत. मोठे अधिकारीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चीनला जात आहेत. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, चीनसोबत ते इराणबद्दल चर्चा करणार आहेत. मात्र, हा बैठकीचा मुख्य मुद्दा नसणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दाैऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. इराणसोबतच्या युद्धात देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर गंभीर आरोप केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात चीन हा इराणला मदत करत असल्याचे म्हटले होते. शिवाय काही दिवसांपूर्वी होर्मुज खाडीत चीनच्या मालवाहू जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...