होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेकडून मोठी कारवाई, जगात खळबळ, भारतीय..
गेल्या 48 तासांपासून इराण आणि अमेरिका युद्ध एका धक्कादायक स्थितीत आले. युद्धबंदी करारावर बैठकीचे आयोजन होणार होते. मात्र, धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. यादरम्यानच अमेरिकेने होर्मुज खाडीत घेतलेल्या निर्णयाने मोठी खळबळ उडाली.

इराण आणि अमेरिका युद्धातील शांतता बैठक इस्लामाबाद येथे होणार होती. मात्र, आता परिस्थिती चिघळली आहे. स्थिती भयंकर झाली. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनले. यादरम्यानच अमेरिकेने धक्कादायक पाऊल उचलले. इराणकडून मोठा इशारा देत आम्ही जोरदार प्रतिउत्तर देऊ असे म्हटले. होर्मुज खाडी जवळ इराणचे जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले. हे जहाज अमेरिकेची नाकेबंदी तोडत असल्याचा आरोप अमेरिकेने केला. इराणच्या जहाजावर अमेरिकेने कब्जा केल्याने परिस्थिती चिघळली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही ओमान खाडीत इराणच्या जहाजाला टार्गेट करत त्याला ताब्यात घेतले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, हे जहाज होर्मुज खाडीतील नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकेने जहाज ताब्यात घेतल्यानंतर इराणही आक्रमक भूमिकेत आहे.
अमेरिकेकडून सांगण्यात आले की, या जहाजाला आम्ही परत जाण्याच्या सूचना दिल्या होता. पण ते थांबत नव्हते. त्यानंतर आम्ही हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. या इराणी जहाजाचे नाव तूस्का आहे. सध्याच्या परिस्थितीत हे इराणी जहाज अमेरिकेच्या ताब्यात आहे. जहाज अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर इराणकडून याला जोरदार उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
इराणी टीव्ही ISNA ने इराणी मिलिट्री कमांड सेंटर खातम अल अंबिया यांच्या मते लवकरात लवकर अमेरिकेला उत्तर दिले जाईल. इराणच्या प्रवक्तांनी म्हटले की, आम्ही अमेरिकेच्या या करवाईला खूप लवकर उत्तर देऊ. आता होर्मुज खाडी जवळ काहीतरी खतरनाक करण्याच्या तयारीत इराण असल्याचे बघायला मिळत आहे. युद्धविराम बैठक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसल होती.
मात्र, गेल्या 48 तासात संपूर्ण परिस्थिती बदलून गेल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेने इराणजवळ केलेल्या नाकेबंदीमुळे स्थिती अधिक चिघळत आहे. हेच नाही तर होर्मुज खाडी खुली ठेवण्याचा दावा करणाऱ्या इराणकडून आता पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इराणकडून पूर्णपणे होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्ण होर्मुज खाडी ठप्प झाल्याचे बघायला मिळत आहे.