इस्रायलाच्या त्या एका हल्ल्यानं इराण हादरलं; युद्धविरामाची तयारी, अमेरिकेला पाठवला संदेश

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. इस्रायलकडून इराणवर हल्ले करण्यात येत आहेत, तर तेवढ्याच आक्रमकतेनं इराणकडून देखील या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जात आहे.

इस्रायलाच्या त्या एका हल्ल्यानं इराण हादरलं; युद्धविरामाची तयारी, अमेरिकेला पाठवला संदेश
iran israel feature
| Updated on: Jun 16, 2025 | 9:14 PM

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. इस्रायलकडून इराणवर हल्ले करण्यात येत आहेत, तर तेवढ्याच आक्रमकतेनं इराणकडून देखील या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. यामुळे मध्यपूर्वेमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. मात्र आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे, इराणकडून युद्धविरामाचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी इराणकडून एक अट ठेवण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार या संदर्भात इराणी अधिकाऱ्यांनी मध्यस्थांमार्फत अमेरिका आणि इस्रायला एक संदेश पाठवला आहे.

जर इस्रायलने हल्ले थांबवले तर आम्ही देखील आमची सैन्य कारवाई तातडीनं मागे घेण्यास तयार आहोत असं इराणने म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायलने इराणच्या नतान्ज्ञ आणि इस्फहान सारख्या धोरणात्मक अणुस्थळांना लक्ष्य केल्यानंतर आता इराणकडून यु्द्धविरामासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. इराणने देखील इस्रायलच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं, मात्र आता इराणकडून युद्धविरामाचे संकेत देण्यात आले आहेत.

इराणी अधिकाऱ्यांनी मध्यस्थांच्या माध्यमातून अमेरिका आणि इस्रायला संदेश पाठवला आहे, त्यांनी युद्धविरामाची तयारी दाखवली आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी त्यासाठी एक अट देखील ठेवली आहे, जर इस्रायलने आमच्यावर होणारे हल्ले थांबवले तर आम्ही देखील सैन्य कारवाई थांबवू असं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.दुसरीकडे आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्यानं देखील इराणने अशी भूमिका घेतली असावी असं बोललं जातं आहे.

मात्र आता इराणच्या या प्रस्तावाला यश येणार का हे पाहावं लागणार आहे, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आता विजय आपलाच आहे. आपण विजयाच्या वाटेवर आहोत. लवकरच तेहरानच्या आकाशात आपली सत्ता असेल असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता इराणचा हा प्रस्तावर स्विकारला जाणार की युद्ध सुरूच राहणार हे पाहावं लागणार आहे. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणचे अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि टॉप कमांडर मारले गेले आहेत, त्यामुळे आता इराणकडून युद्धविरामाचे संकेत देण्यात आले आहेत.