AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahad Nagar Parishad Election Result : महाडमध्ये गोगावलेंचा मास्टरस्ट्रोक, नगराध्यक्षपद खेचून आणलं, तटकरेंना मोठा धक्का

महाड नगरपरिषद निवडणुकीत आमदार भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे सुनील कविस्कर नगराध्यक्षपदी विजयी झाले असून, गोगावलेंनी तटकरेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व सिद्ध केले आहे.

Mahad Nagar Parishad Election Result : महाडमध्ये गोगावलेंचा मास्टरस्ट्रोक, नगराध्यक्षपद खेचून आणलं, तटकरेंना मोठा धक्का
sunil tatkare bharat gogawale
| Updated on: Dec 21, 2025 | 12:34 PM
Share

कोकणच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांच्यासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे यांचा मोठा दबदबा आहे. मात्र भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना होमग्राऊंडवर सुरुंग लावला आहे. महाडमध्ये तटकरेंच्या रणनीतीला भरत गोगावलेंनी खिंडार पाडले आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेला हुलकावणी देणारे नगराध्यक्षपद यंदा भरत गोगावलेंनी खेचून आणले आहे. शिवसेनेचे सुनील कविस्कर यांनी नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला असून, पक्षाचे ८ नगरसेवकही निवडून आले आहेत.

या निकालानंतर भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय म्हणजे जनतेने विकासकामांना दिलेला कौल आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने जो विश्वास दाखवला, त्याचे आम्ही निश्चितच सोनं करू. आमचे ५ उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले याचे शल्य नक्कीच आहे, पण आम्ही महाडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे भरत गोगावले म्हणाले.

यावेळी भरत गोगावले यांनी महाड आणि श्रीवर्धनमधील निकालावरही भाष्य करत तटकरेंवर टीका केली. दुसऱ्यांच्या भांड्यात डोकावताना आपलं भांडं स्वच्छ आहे का हे बघायला हवं होतं. श्रीवर्धनमध्ये आम्ही चमत्कार केला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला.

दरम्यान गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. गोगावले यांनी उघडपणे या पदावर आपला दावा सांगितला आहे. तर सुनील तटकरे यांनीही पालकमंत्रीपद हवे असं सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यात कमालीचा वाद दिसून येत आहे. त्यातच आता महाडमध्ये राष्ट्रवादीला धूळ चारल्यानंतर आता जिल्हा राजकारणात भरत गोगावलेंची ताकद वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी त्यांचा दावा अधिक प्रबळ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.