इराणच्या हल्ल्यांनी हैफा हादरले, इस्त्रायलसाठी किती महत्वपूर्ण आहे हे शहर?

इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हैफा रिफायनरीला मोठी आग लागली. इस्रायली चॅनल १२ ने देखील हैफा जवळील एका मोक्याच्या ठिकाणी मोठी आग लागली. इराणकडून हैफा शहराला लक्ष्य करण्यामागे महत्वाचे कारण आहे.

इराणच्या हल्ल्यांनी हैफा हादरले, इस्त्रायलसाठी किती महत्वपूर्ण आहे हे शहर?
iran attacks
| Updated on: Jun 15, 2025 | 12:49 PM

इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. इस्त्रायल हल्ल्यास उत्तर देताना इराणकडून पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागण्यात आले. रविवारी सकाळी इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलमधील हैफा शहर हादरले. हैफा शहर हे तेल रिफायनरीचे केंद्र आहे. इराणच्या हल्ल्यानंतर हैफामधून आगीचे लोट दिसून येत आहे.

हैफा शहराचे महत्व का?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हैफा परिसरात मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे दिसत आहे. आयआरजी टेलिग्रॉम चॅनलने दिलेल्या बातमीत म्हटले की, इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हैफा रिफायनरीला मोठी आग लागली. इस्रायली चॅनल १२ ने देखील हैफा जवळील एका मोक्याच्या ठिकाणी मोठी आग लागल्याची पुष्टी केली आहे. हैफा शहर इस्रायलसाठी खूप महत्वाचे आहे. या शहरावर हल्ला झाल्यास इस्रायल आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकते.

इराणने ज्या हैफा शहरावर हल्ला केला, ते इस्त्रायलमधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या तीन लाख आहे. इस्त्रायलची पोर्ट सिटी म्हणून या शहराची ओळख आहे. हैफा पोर्टवरुन इस्त्रायलसाठी मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. हुतीद्वारे लाल सागरातील मार्ग बंद केल्यानंतर इस्त्रायलने इलाट पोर्टवरुन होणारा काही व्यापार हैफा बंदरावर शिफ्ट केला आहे.

तेल अवीवमध्येही हल्ले

इराणने रविवारी सकाळी इस्त्रायलवर पुन्हा मोठा हल्ला केला आहे. इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमधील आठ मजली इमारतीवर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच इराणकडून तेल अवीवमधील इतर काही भागांवरही हल्ले करण्यात आले आहे.

इराणने शुक्रवारी इस्त्रायलच्या हल्ल्यास उत्तर देण्यासाठी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 ची सुरुवात करत हल्ले सुरु केले होते. हे हल्ले अजूनही सुरु आहे. त्यापूर्वी इस्त्रायलने शुक्रवारी सकाळी ऑपरेशन राइजिंग लॉयनला सुरुवात केली. या ऑपरेशनमध्ये इराणचे लष्कर प्रमुख, कमांडर आणि अणू शास्त्रज्ञांचाही मृत्यू झाला. इराणच्या अण्वस्त्र केंद्राचे मोठे नुकसान झाले. आता इराणकडूनही उत्तर दिले जात असल्याने दोन्ही देशातील संघर्ष चिघळला आहे.