
अणू करारावरून सध्या अमेरिका आणि इराणमधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेकडून इराणच्या दोन अणू केंद्रांवर हल्ला देखील करण्यात आला होता, यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं होतं. मात्र आता इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. पहिला धक्का हा आर्मोनियामध्ये दिला आहे, तर दुसरा लेबनानमध्ये बसला आहे, आर्मेनियाच्या मुद्दावर स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अॅक्टिव्ह होते. मात्र इराणने अमेरिकेला असा धक्का दिला आहे, ज्यामुळे ट्रम्प हे बॅकफूटवर गेले आहेत.
अर्मेनियाचा यूटर्न
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात अर्मेनिया आणि अजरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत व्हाइट हाउसमध्ये एक बैठक केली होती. या बैठकीमध्ये जंगेजुर कॉरिडॉअरसाठी तीन्ही राष्ट्राध्यक्षांचं एकमत झालं होतं. हा कॉरिडॉअर अजरबैजान आणि आर्मेनियाच्या सीमेमधून जात होता, या कॉरिडॉअरमुळे इराणला मोठा धोका होता.
त्यामुळे आर्मेनियाची ट्रम्प यांच्यासोबत या कॉरिडॉअरबाबत बैठक झाल्यानंतर इराणचं सरकार अॅक्टिव्ह झालं, इराणचे परराष्ट्र मंत्री तातडीनं आर्मेनियाला पोहोचले, त्यांनी तिथे आर्मेनियाच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. इराणसोबत चर्चा झाल्यानंतर आर्मेनियानं लगेच 360 अंशामध्ये यूटर्न घेतला. आर्मेनियानं जंगेजूर कॉरिडॉअरला आपली परवानगी नसल्याचं म्हटलं आहे. तर इराणकडून देखील हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, अमेरिकेला या कॉरिडॉअरच्या नावाखाली आमच्या सीमांमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही, कारण तसं झालं तर तो आमच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला असेल.
दुसरीकडे अमेरिकेच्या सांगण्यावरून लेबनान सरकारने सध्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेविरोधात मोहीम उघडली होती, मात्र याचदरम्यान इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी लेबनानला भेट दिली आणि तिथे जाऊन जाहीरपणे हिजबुल्लाहला पाठिंबा दिला, त्यांचं समर्थन केलं, त्यामुळे इथे पण अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे, इराणने उचललेल्या या पावलामुळे अमेरिकेच्या या मोहिमेला खिळ बसल्याचं बोललं जात आहे. हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.