AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुझ सुरू करू पण… इराणच्या नव्या अटींनी जगाचं टेन्शन वाढलं, डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करणार?

Strait of Hormuz : इराणने अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

होर्मुझ सुरू करू पण... इराणच्या नव्या अटींनी जगाचं टेन्शन वाढलं, डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करणार?
Iran vs USA hoemuz latest updateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 18, 2026 | 9:48 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव अजूनही कायम आहेत. अशातच आता इराणने अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ अमेरिकेने इराणच्या सर्व प्रमुख मागण्या पूर्ण करेपर्यंत खुला केला जाणार नाही असं मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी म्हटलं आहे. इराणच्या या इशाऱ्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता ड्रोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सांगितले की, ‘अमेरिका दिलेली आश्वासने प्रत्यक्षात अंमलात आणत नाही, तोपर्यंत इराण कोणत्याही प्रकारचा करार किंवा तडजोड स्वीकारणार नाही.’ गालिबाफ यांच्या मते इराणच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे इराणच्या बंदरांवर लादलेली नौदल नाकेबंदी तातडीने हटवणे. याशिवाय तेल निर्यातीवरील निर्बंध हटवणे आणि परदेशात गोठवलेली इराणची संपत्ती मुक्त करणे यांचाही या मागण्यांमध्ये समावेश आहे.

होर्मुझ खुलणार नाही…

सरकारी टीव्हीवर बोलताना गालिबाफ यांनी सांगितले की, ‘मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, सामंजस्य करारात (MoU) अमेरिकेने दिलेली आश्वासने पूर्णपणे पूर्ण होईपर्यंत स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला केला जाणार नाही. नाकेबंदी हटवणे, तेलावरील निर्बंध संपवणे आणि आमची संपत्ती मुक्त करणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.’

इराण-अमेरिका कराराची मुदत संपली

इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या 60 दिवसांच्या सामंजस्य कराराची (MoU) मुदत सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी संपली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढले असून तणावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गालिबाफ यांचे वक्तव्य हे अमेरिकेला दिलेला कठोर संदेश मानले जात आहे. अमेरिका आपल्या आश्वासनांची पूर्तता करत नसेल, तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहील, असे यातून स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय हितांशी तडजोड नाही

स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेल व्यापाराचा मोठा हिस्सा याच मार्गातून होतो. त्यामुळे इराणच्या या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर आणि प्रादेशिक सुरक्षेच्या परिस्थितीवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गालिबाफ यांनी आपल्या वक्तव्यात पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ‘इराणला शांतता हवी आहे; मात्र देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि राष्ट्रीय हितांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.’

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा