मोठी अपडेट! इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या मुख्यालयावर इराणचा हल्ला

Iran-Israel War : इराण आणि इस्त्राइलमधील युद्ध जोरदार तापले आहे. इराणने थेट इस्त्राइलच्या 'मोसाद'वर हल्ला केला आहे.

मोठी अपडेट! इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर इराणचा हल्ला
Iran-Israel War
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 17, 2025 | 1:41 PM

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाची सुरुवात ही इस्त्रायलच्या बाजूने करण्यात आली होती. इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमापासून आमच्या अस्तित्वाला धोका आहे, असे सांगत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यूह यांनी युद्ध सुरु केले. तसेच त्याला त्यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ असे नाव दिले. आता इराणने इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणा मुख्यालयावरच हल्ला केला आहे.

इस्त्रायला मोठा झटका

इस्रायलकडून गुरुवार रात्रीपासून इराणमधील अणवस्त्र तळ, त्यांचे बॅलेस्टिक मिसाइल्सच उत्पादन करणारे कारखाने, सैन्य ठिकाणं आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांना संपवण्याच मिशन सुरु झाले. त्यानंतर इराणने देखील इस्त्रायलला चोख उत्तर दिले. आता थेट इराणने ‘मोसाद’वर हल्ला केला आहे.

इस्त्राइयची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ला इराणने लक्ष केले. या हल्ल्यात ‘मोसाद’ पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचे दिसत आहे. आता या हल्ल्याला इस्त्रायल काय उत्तर देणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

इराणची लष्करी क्षमता आणि इस्रायलवर हल्ल्याची ताकद

इराणवर अनेक निर्बंध असल्याने त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आहे. सध्या त्यांची लष्करी ताकद अमेरिका किंवा इस्रायलच्या बरोबरीची नाही. तरीही, इराणने मिसाइल आणि ड्रोन तंत्रज्ञानात प्रगती केली आहे, ज्यामुळे इस्रायलला जखमी करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्या दोन दिवसांतच टीव्हीवर दिसलेल्या दृश्यांमधून हे स्पष्ट झाले. इराणच्या अनेक मिसाइलांनी इस्रायलच्या अभेद्य हवाई संरक्षण कवचाला भेदले आणि तेल अवीव, हायफासह इतर शहरांतील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. इस्रायलकडे F-16, F-22, F-35 सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत, तर इराणकडे अशी विमाने नाहीत. तरीही, इस्रायलचे नुकसान करण्याइतकी ताकद इराणकडे निश्चितच आहे.

मुस्लिम देश इराणच्या पाठीशी का नाहीत?

जगात आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेले काही मुस्लिम देश मुस्लिम जगताचे नेतृत्व करण्याच्या स्पर्धेत आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, कतार, तुर्की आणि इराण यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतात. यात शिया-सुन्नी वाद आणखी गुंतागुंत वाढवतो. इराण हा शिया बहुल देश आहे, त्यामुळे इस्रायलविरुद्धच्या युद्धात इतर मुस्लिम देश उघडपणे इराणला पाठिंबा देत नाहीत. उलट, इराणच्या बाजूला असलेला जॉर्डन हा मुस्लिम देश इस्रायलला साथ देत आहे. इराणचे नेते अयातोल्लाह खोमेनी यांना मुस्लिम जगताचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे इराण नेहमी अमेरिका आणि इस्रायलविरोधात आक्रमक भूमिका घेतो.

इस्रायल हा मध्य पूर्वेतील एक छोटा देश आहे, ज्याच्या सर्व सीमा मुस्लिम देशांना लागून आहेत. इस्रायलच्या स्थापनेपासूनच हे मुस्लिम देश त्याच्या अस्तित्वाला विरोध करत आहेत. त्यांनी इस्रायलविरुद्ध अनेक युद्धे लढली, त्यांना वाटले की इस्रायलला सहज नष्ट करता येईल.