युद्धात इराणची अत्यंत मोठी घोषणा, जगात हाहाकार, थेट म्हटले, कधीही..

Iran-US War : इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा एकदा घडामोडी घडताना दिसत आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता पुन्हा एकदा युद्ध सुरू होण्याची स्थिती आहे. अमेरिकेलाही मोठा झटका बसल्याचे दिसत आहे.

युद्धात इराणची अत्यंत मोठी घोषणा, जगात हाहाकार, थेट म्हटले, कधीही..
Mojtaba Khamenei
| Updated on: Apr 19, 2026 | 11:00 AM

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढला आहे. त्यामध्येच इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले की, जोपर्यंत युद्ध पूर्णपणे संपत नाही, तोवर प्रदेशात शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांवर त्यांचे नियंत्रण असेल. ते जहाजांवर लक्ष ठेवतील. त्यांचे पूर्णपणे नियंत्रण असेल. दुसरीकडे अमेरिकेनेही इराणवरील नाकेबंदी काढण्यास नकार दिला. अमेरिकेला होर्मुज खाडीवर नियंत्रण हवे आहे, पण याकरिता इराणकडून नकार देण्यात आला. त्यामध्येच इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने आपली भूमिका जाहीर केली. इराणी मीडियाच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या नौदल नाकेबंदीमुळे होर्मुजच्या खाडीत पुन्हा कडक नियंत्रण लागू केले जात असल्याची घोषणा इराणच्या मुख्य लष्करी कमांड, खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सने केली, त्यांनी एक निवेदन जारी केले.

ज्यानंतर एकच खळबळ उडाली. एसएनएससीने म्हटले की, होर्मुज खाडीतून जाणाऱ्या जहाजांची ते माहिती घेतील. त्यांना परवानगी देतील. सुरक्षा आणि पर्यावर शुल्क आकारेल. युद्धकालीन नियमांनुसार, जहाजांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतील. शत्रुंनी होर्मुज खाडीत अडथळा निर्माण केला तर नाैदल नाकेबंदी करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही अत्यंत मोठी धमकी देण्यात आली. होर्मुज खाडीत तणाव वाढत आहे. 28 फेब्रुवारीपासून होर्मुजमध्ये तणाव आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा इराणकडून मोठा इशारा देण्यात आला. इराणच्या या घोषणेनंतर जगात एकच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. स्थिती गंभीर आहे. अमेरिकेला इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने मोठा आव्हान दिले.

हेच नाही तर होर्मुज खाडीत इराणचेच नियंत्रण असणार आहे. इराणच्या परवानगीशिवाय एकही जहाज होर्मुज खाडी पार करू शकणार नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने अमेरिकेवर मोठा दबाव आहे. शुल्क देणाऱ्यांना होर्मुज खाडीत प्रथम प्राधान्य देऊ असे इराणकडून सांगण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये असलेल्या बैठकीपूर्वी आक्रमक भूमिका इराणकडून घेण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. शुक्ल भरल्यानंतरही जहाज सोडले जाणार असल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात आले.

Follow Us