युद्धाच्या संकटात आनंदाची बातमी, जगाला ज्याची प्रतिक्षा ते घडलेच, थेट मंगळवारी..

इराण आणि अमेरिका युद्धात परिस्थिती बिकड आहे. होर्मुज खाडीत तणाव अधिक आहे. त्यामध्येच आता इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदी कराराबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. सोमवारी ही बैठक होणार नाहीये.

युद्धाच्या संकटात आनंदाची बातमी, जगाला ज्याची प्रतिक्षा ते घडलेच, थेट मंगळवारी..
Iran US ceasefire agreement meeting
| Updated on: Apr 20, 2026 | 8:16 AM

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. त्यामध्येच गेल्या काही तासांपासून होर्मुज खाडीत धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. ज्याने जगाची झोप उडाली. होर्मुज खाडीत तणाव आहे. अमेरिकेने एक इराणी जहाज ताब्यात घेतले. अगोदर या जहाजावर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर अमेरिकेने त्याला जप्त केले. अमेरिकेला जोरदार उत्तर देऊ असे इराणकडून सांगण्यात आले. अमेरिकेने मोठी नाकेबंदी केली. ज्यामुळे इराणच्या बंदरातून जहाजांना बाहेर पडणे शक्य होत नाही. इराणला रोखण्यासाठी अमेरिकेकडून चाल खेळण्यात आली. इराणच्या बंदरातून एकही जहाज पुढे जाऊ शकत नाही. मात्र, अमेरिकेने इराणी जहाज जप्त केल्यानंतर स्थिती भयंकर झाली. होर्मुज खाडी आता दुसरे युद्धाचे मैदान बनले. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक देश संकटात आहे. एलपीजीचे संकट अधिक वाढताना दिसत आहे.

इराण अमेरिका युद्धात पहिली शांतता करार बैठक झाली. मात्र, त्यातून काही निर्णय होऊ शकला नाही. दुसरी बैठक इस्लामाबाद येथे आहे. मात्र, त्यापूर्वी तणाव वाढला. आज सोमवारी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका युद्धबंदी शांतता करार बैठक होणार असल्याची चर्चा होती. मात्र, काहीच हालचाली बघायला मिळाल्या नाहीत. यामुळे ही बैठक होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यादरम्यान मोठी माहिती पुढे आली.

अमेरिकन वृत्तसंस्था सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी मंगळवारी होऊ शकते. इराणी शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल होईल. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कलिबाफ हे इराणकडून या बैठकीचे प्रमुख असतील. जेडी व्हान्स अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. मागच्या बैठकीत काही मुद्द्यांमुळे युद्धबंदी करार होऊ शकला नाही, त्यातून आता मार्ग काढला जाऊ शकतो.

अमेरिकेने केलेली नाकेबंदी हटवण्यासाठी इराण आग्रही राहणार असल्याचे कळत आहे. जर अमेरिकेने नाकेबंदी हटवली तर त्यांच्याकडून होर्मुज खाडी खुली करण्याची अट ठेवण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर तणाव अधिक वाढला. एका भारतीय जहाजावर इराणकडून होर्मुज खाडीत गोळीबार करण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us