खामेनेई यांचा जनाजा निघण्यापूर्वी उडाला इराणचा थरकाप, कसा सुरक्षित आहे मृतदेह? थेट रस्त्यावरच..
इराण आणि अमेरिका युद्धात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. यादरम्यान आता इराण सरकार अलर्ट मोडवर आहे. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अंतिम यात्रा होणार आहे. मात्र, यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. पहिल्याच हल्ल्यात अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या अमेरिकेने केली. फेब्रुवारी महिन्यापासून त्यांची बॉडी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्ध तब्बल 3 महिन्याच्या मोठ्या संघर्षानंतर थांबले. मात्र, अजूनही अयातुल्ला खामेनेई यांच्यावर अंतिम संस्कार बाकी आहेत. इराण आणि इराक यांच्याकडून 5 दिवस सुपुर्दत-ए-खाक केले जाईल. या ऐतिहासिक क्षणांवेळी इराण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. इराण सरकारला एक चिंता आहे की, खामेनेई यांच्या जनाजामध्ये लोकांची गर्दी आणि त्यामुळे काही मोठे घडू नये. इराणच्या इंटरनॅशनल रिपोर्टनुसार, राजधानी तेहरानमध्ये अंतिम यात्रा काढण्याअगोदर सर्वात अगोदर खामेनेई यांचे पार्थिव 3 दिवस तेहरानच्या मोसल्ला नमाज परिसरात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल.
त्यानंतर पार्थिव शरीर इराकच्या शियाओ पवित्र शहर नजफ आणि कर्बला येथे आणले जाईल. या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणे मोठे आवाहन आहे. सीमा पार अंतिम यात्राच्या मुद्द्यात इराकच्या अधिकाऱ्यांनी इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांच्यासोबत चर्चा केली. बगदाद दाैरा देखील केला. इराणकडून सुरक्षेची तयारी केली जात आहे. जुन्या गोष्टी लक्षात घेता पूर्ण काळजी घेतली जात आहे.
इतिहासात अंतिम यात्रेवेळी अशा काही गोष्टी घडल्या होत्या, ज्याने पूर्ण देश हादरला होता. 3 जून 1989 ला इस्लामी गणराज्याचे संस्थापक अय्यातुल्लाह रूहुल्लाह खुमैनी यांच्या निधनानंतर खूप जास्त लोकांची गर्दी उसळली होती. 3 जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात कमांडर कासिम सुलेमानी यांच्या जनाजामध्ये देखील मोठी दुर्घटना घडली होती.
अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा जीव गेला. या हल्ल्यात अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई जिवंत राहिला. त्यानंतर त्याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले होते. यादरम्यान इराण हार स्विकारेल, असे सांगितले जात होते. मात्र, इराणने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि अमेरिकेला धडा शिकवला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली होती.