इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा अखेर रिचेबल; पहिला व्हिडिओ समोर, इराण-अमेरिका संघर्षात पुन्हा ट्विस्ट

मृत्यू होणार असल्याची चर्चा असताना मोजतबा हे रिचेबल झाले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा अखेर रिचेबल; पहिला व्हिडिओ समोर, इराण-अमेरिका संघर्षात पुन्हा ट्विस्ट
| Updated on: Aug 09, 2026 | 9:51 AM

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना अमेरिकेच्या हल्ल्यात दुखापत झाल्याची अफवा सोशल मीडियीवर वाऱ्यासारखी पसरली होती. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे मोजतबा मृत्यूशी झुंज देत असलयाचा दावा केला जात होता. परंतु मोजतबा खामेनींच्या नव्या व्हिडिओने जगभरातील चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये मोजतबा यांची तब्येत ठणठणीत वाटत आहे. इराणच्या एका वृत्त संस्थेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

इस्त्रायलच्या एका माध्यमांनी मोजतबा खामेनी यांची प्रकृती गंभीर असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो, असे सांगितले होते. या वृत्तात इराणवायर आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या प्रशासनाशी संबंधित सूत्रांचा संदर्भ दिला होता. या वृत्तात, मोजतबा यांच्या मृत्यूची कधीही बातमी येऊ, असा दावा करण्यात आला होता. पण आता नव्या व्हिडिओमुळे सर्व दावे फेल ठरल्याचे स्पष्ट झालं आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात मोजतबा यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या हत्येनंतर इराणच्या सर्वोच्चपदी मोजतबा खामेनी विराजमान झाले होते. परंतु मोजतबा खामेनी यांनी या सर्वोच्च पदाचा पदभार स्वीकारल्यापासून सार्वजनिक ठिकाणी कुठेच दिसलेले नव्हते. ते केवळ लेखी स्वरुपात भूमिका मांडत होते. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं.

एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या हल्ल्यात मोजतबा जखमी झाले होते. त्यांच्या शरीर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावर टाळला. ते अमेरिकेपासून लपून बसले होते, असे वृत्तात म्हटलं आहे. परंतु इराणच्या सरकारी अधिकाऱ्यांनी मोजतबा खामेनी यांना किरकोळ जखमा झाल्याच्या म्हटलं होतं. आता नव्या व्हिडिओवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मोजतबा यांचा लाईव्ह व्हिडिओ नसल्याने शंका उपस्थित करण्यात येत आहे. मोजतबा यांचा व्हिडिओ एआय असल्याचाही सोशल मीडियावर केला जात आहे. परंतु या शंकावर इराणकडून भाष्य करण्यात आलेलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us