Putin Body Double Secret : पुतिन यांच्या बॉडी डबलच सत्य काय? आणि तो का वापरतात?

Putin Body Double Secret : पुतिन हे साधसुधं व्यक्तीमत्व नाही. त्यांना राजकीय वारसा कुटुंबाकडून मिळालेला नाही. अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुतिन हे रशियन गुप्तचरसंस्था केजीबीचे एजंट बनले.

Putin Body Double Secret : पुतिन यांच्या बॉडी डबलच सत्य काय? आणि तो का वापरतात?
Putin Body Double Secret
Image Credit source: PTI
Updated on: Dec 04, 2025 | 1:42 PM

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या हाताशिवाय बॉडी डबल ठेवण्याची सुद्धा चर्चा होते. पुतिन सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यासोबत बॉडी डबल ठेवतात असं मीडियामध्ये चर्चा आहे. पुतिन यांच्या खासगी जीवनाबद्दल मीडियामध्ये अनेकदा अशा प्रकारच्या बातम्या येत असतात. बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये या बद्दल खुलासा झालेला. पुतिन यांचा कुठलाही बॉडी डबल नाहीय. रशियन राष्ट्रपती पुतिन यांनी एका इंटरव्यूमध्ये मान्य केलेलं की, सुरक्षा कारणांमुळे त्यांना बॉडी डबलचा उपयोग करण्याचा प्रस्ताव दिलेला. पण त्यांनी तो फेटाळून लावला होता.

काही क्षेत्रात सुरक्षेसाठी आपल्यासारख्या दिसणाऱ्या लोकांचा उपयोग केला जातो. त्याला बॉडी डबल म्हणतात. पुतिन यांनी त्यांचा बॉडी डबल असल्याचं फेटाळून लावलं. सन 2000 च्या सुरुवातीला मला असा प्रस्ताव देण्यात आलेला. त्यावेळी रशियाचं चेचेन बंडखोरांविरोधात युद्ध सुरु होतं.

तुम्ही खरे आहात का?

आंद्रेई वंडेंको नावाच्या पत्रकाराने पुतिन यांच्यासमोर हा प्रश्न विचारलेला. रशियन वृत्तसंस्था ताससाठी आंद्रेई वंडेंकोनी पुतिन यांची मुलाखत घेतलेली. त्यांनी थेट पुतिन यांनाच विचारलं, तुम्ही खरे आहात का? त्यावर पुतिन यांनी पुष्टी केली की, हो मी खरा आहे. सुरक्षा कारणांमुळे बॉडी डबल वापरण्याचा त्यांनी इन्कार केलेला.

केजीबीचे एजंट बनले

पुतिन हे साधसुधं व्यक्तीमत्व नाही. त्यांना राजकीय वारसा कुटुंबाकडून मिळालेला नाही. अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुतिन हे रशियन गुप्तचरसंस्था केजीबीचे एजंट बनले. एजंट म्हणून रशियाच्या सुरक्षेसाठी त्यांनी अनेक मिशन्स पार पडली. 21 व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात झाली.

रशियाला पुन्हा उभं केलं

त्यावेळी रशिया अडचणीत होता. अशा काळात पुतिन यांनी रशियाची सूत्र स्वीकारली. बलाढ्य अमेरिकेसमोर रशियाला पुन्हा सक्षमपणे उभं करण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. ते त्यांनी यशस्वीरित्या पेललं. आज रशिया अमेरिकेसमोर तितक्याच ताकदीने उभा आहे. जागतिक राजकारणात रशियाचं स्थान कायम आहे. शीत युद्धाच्या काळात सोविएत यूनियन आणि अमेरिका अशा दोन महासत्ता होत्या. पुढे जाऊन सोविएत युनियनचे तुकडे पडले.