
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. चार वर्षानंतर हा पुतिन यांचा भारत दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याला खूप खास मानले जात आहे. कारण यात व्यापार आणि संरक्षण तसेच ऊर्जा करार होण्याची शक्यता आहे. व्लादिमीर पुतिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीत जगजाहीर आहे. ऑगस्टमध्ये चीनमध्ये झालेल्या एससीओ समिटमध्ये देखील दोन्ही नेते अशा प्रकारे भेटले त्यावरुन अनेक देशांचे टेन्शन वाढले होते. आता पुन्हा दोन्ही नेते भेटत असल्याने जगभराचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि युक्रेन यांची खास करुन पुतिन यांच्या दौऱ्यावर नजर आहे. पुतिन यांच्या दौऱ्याच्या काही दिवसांआधी भारताच्या अर्थव्यवस्थे संदर्भात शुभ बातमी आली. भारताचा जीडीपी जुलै ते सप्टेंबरमध्ये ८.२ टक्के ग्रोथ रेटने वाढला आहे. सध्या भारत ४.३ ट्रीलियन डॉलरच्या जीडीपीसह जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे.तर रशियाच्या नंबर नववा आहे. रशियाचा जीडीपी २.५४ ट्रीलियन डॉलर आहे.
आता रशियाची करन्सी आणि भारतीय रुपयांची तुलना केली तर यात जास्त अंतर नाही. Xe कन्वर्टरच्या अनुसार एका रशियाच्या एका रुबलची किंमत भारतात १.१६ रुपयांच्या बरोबर आहे. म्हणजे दोन्हीत केवळ १६ पैशांचे अंतर आहे.रशियाच्या रुबलची किंमत भारतीय रुपयांपेक्षा १६ पैसे जास्त आहे. भारताचा एक रुपया ०.८५ रशियन रुबलच्या बरोबर आहे. डॉलरशी तुलना करता एका डॉलरची किंमत ७७.२० रशियन रुबलच्या बरोबर आहे.जर एक अमेरिकन डॉलर भारतात ९० रुपयांच्या बरोबर आहे.
व्लादिमीर पुतिन अखेरच्या वेळी २०२१ मध्ये भारतात आले होते. भारत-रशिया वार्षिक परिषदेसाठी आले होते. परंतू पुतिन आणि पीएम मोदी याचवर्षी ऑगस्टमध्ये चीनचे शहर तियामिन शहरात भेटले होते. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये एससीओ समीट झाली होती. त्यात पुतिन आणि पीएम मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली होती. तिघेही एकत्र हास्यविनोद आणि मोकळेपणाने गप्पा मारताना दिसले.