Donald Trump : फ्रान्समध्ये सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनावरुन ट्रम्प यांचं इस्लामबद्दल मोठं वक्तव्य

Donald Trump : फ्रान्सच्या शाळांमधील मुद्यावरुन तिथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. हे आंदोलन हळूहळू देशभरात पसरलं. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. ट्रम्पनी काय म्हटलय ते जाणून घ्या.

Donald Trump : फ्रान्समध्ये सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनावरुन ट्रम्प यांचं इस्लामबद्दल मोठं वक्तव्य
Donald trump
Image Credit source: Reuters
| Updated on: Oct 07, 2026 | 9:04 AM

सध्या फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शनं सुरु आहेत. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात होणारं मायग्रेशन म्हणजे स्थलांतर आणि इस्लामला जबाबदार ठरवलं आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. “फ्रान्समध्ये जे काय चाललय ते नियंत्रणाबाहेर आहे, याला मोठ्या प्रमाणात झालेलं स्थलांतर जबाबदार आहे. इस्लामला एका महान देशाला ताब्यात घ्यायचं आहे” असं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलच्या पोस्टमध्ये म्हटलय. फ्रान्सच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षकांची कमतरता, वर्गात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी, खराब पायाभूत सुविधा आणि चांगल्या सुविधांचा अभाव यासाठी आंदोलन सुरु केलं होतं. हे प्रदर्शन हळूहळू देशातील अनेक शहरांमध्ये पसरलं. पॅरिससह मार्सेय, ल्यों, लिल आणि स्ट्रासबर्ग सारख्या शहरात विद्यार्थ्यांनी शाळेचे गेट बंद केले. अनेक ठिकाणी हिंसक विरोध प्रदर्शन झालं. पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यावेळी वाहनं पेटवून देण्याच्या घटना सुद्धा समोर आल्या.

त्याच मुद्यावरुन मंगळवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर टीका केली. ट्रुथ सोशलवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी लिहिलं की, “फ्रान्समध्ये जे चाललय ते अनियंत्रित मास मायग्रेशनशिवाय जास्त काही नाही. हा फक्त शाळेचा विषय नाही. इस्लामचा कधीकाळी महान देश राहिलेल्या फ्रान्सवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे”

Loading...

इस्लाम आणि मायग्रेशनशी जोडलं

फ्रान्सच्या गृहमंत्रालयाच्या रिपोर्टनुसार मंगळवारी संपूर्ण देशात अडीच लाखापेक्षा जास्त लोक प्रदर्शनात सहभागी झालेले. आयोजकांनी ही संख्या चार लाखापेक्षा जास्त असल्याचा दावा केला. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा हा आंदोलकांचा मुख्य मुद्दा होता. काही आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या. ट्रम्प यांनी या घटनांना थेट इस्लाम आणि मायग्रेशनशी जोडलं आहे.

ट्रम्प यांनी याआधी सुद्धा युरोपच्या स्थलांतर धोरणाची निंदा केली आहे. युरोपियन देशांच्या सीमांची नाकेबंदी, तपासणी अधिक कठोर करावी असं ट्रम्प प्रशासनचं मत आहे. फ्रान्समध्ये या प्रदर्शनावरुन दक्षिणपंथीयांनी चिंता व्यक्त केली. नॅशनल रॅलीचे नेते मरीन ले पेन यांनी हिंसक घटनांसाठी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. फ्रान्स सरकारने आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा पथकं तैनात केली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us