AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा तर होणारच! देशातलं असं एक लग्न, एका छोट्या गावात चक्क इंग्लंडवरून आलं वऱ्हाड

प्रेम जात-धर्म आणि सीमा जाणत नाही याची प्रचिती हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात आली. जर्मनीमध्ये भेटलेल्या नेहा आणि इंग्लंडच्या थॉमसने लग्न करण्याचा निर्णय घेतला. थॉमस आपल्या कुटुंबासह इंग्लंडहून थेट मंडीत आला. येथे हिमाचली संस्कृतीनुसार, हिंदू रितीरिवाजांनी त्यांचा विवाह संपन्न झाला. हा आंतरराष्ट्रीय विवाह दोन संस्कृतींना एकत्र आणणारा एक अनोखा सोहळा ठरला.

चर्चा तर होणारच! देशातलं असं एक लग्न, एका छोट्या गावात चक्क इंग्लंडवरून आलं वऱ्हाड
Himachal Pradesh WeddingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 12:36 PM
Share

प्रेम हे आंधळं असतं असं आपण नेहमी म्हणतो. प्रेमाला वय, जात आणि प्रदेशाच्या सीमा नसतात. फक्त हृदयाला हृदय भिडणं तेवढं अपेक्षित असतं. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात याची प्रचिती आली आहे. मंडी येथे राहणाऱ्या नेहाशी विवाह करण्यासाठी चक्क इंग्लंडवरून वरात आली. इंग्लंडचा थॉमस सातासमुद्रावरून हिमाचल प्रदेशात आला. मंडी जिल्ह्यातील करसोग येथे हे लग्न पार पडलं. या अनोख्या लग्न सोहळ्याला पंचक्रोशातील गावकरी उपस्थित होते. विशेष म्हणजे हे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार झालं. यावेळी खास हिमाचली संस्कृती, व्यंजन आणि डोंगराळ भागातील परंपरा पाहायला मिळाली. जर्मनीत नोकरी करताना नेहा आणि थॉमसची मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मंडी जिल्ह्यातील करसोग येथील कुट्टुी गावात नेहा राहते. नेहा आणि थॉमसची भेट जर्मनीत झाली. दोघेही तिथे नोकरी करत होते. एकाच ठिकाणी काम करत असल्याने दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेले असतानाही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबाशी चर्चा केली. आणि दोन्हीकडून मंजुरी मिळताच लग्नाचा बार उडवला गेला.

थेट इंग्लंडमधून आला

नेहाशी लग्न करण्यासाठी थॉमसने इंग्लंडहून हिमाचल प्रदेशात येण्याचा निर्णय घेतला. तो एकटाच आला नाही. तर त्याच्या सोबत त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकही आले. परदेशी नवरदेव आणि वऱ्हाड पाहून सर्वच अचंबित झाले होते. नेहाच्या कुटुंबीयांनी या वऱ्हाडींचं पारंपारिक पद्धतीने स्वागत केलं. एकमेकांना मिठाई भरवून स्वागतही केलं. त्यानंतर भारतीय पद्धतीने या दोघांचं लग्न लागलं. थॉमसच्या कुटुंबीयांनीही नेहाच्या कुटुंबीयांचा सन्मान म्हणून हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अन् सातफेरे झाले…

करसोग येथे हा विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या सर्व विधी उरकल्या गेल्या. दोघांनीही सातफेरे घेतले. नातेवाईकांच्या उपस्थितीत नेहा आणि थॉमस यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. यावेळी नेहा आणि थॉमस यांच्या चेहऱ्यावरी आनंद अवर्णनीय असाच होता. स्थानिकांना तर दोन संस्कृतींचा मिलाप पाहायला मिळाला.

हिमाचलचं सौंदर्य नजरेत भरलं

या लग्नामुळे केवळ नवरदेव आणि नवरीच आकर्षणाचं केंद्र ठरले नाही. तर परदेशातून आलेले पाहुणेही खास आकर्षणाचं केंद्र होते. हिमाचलचे लोक पहिल्यांदाच परदेशी पाहुण्यांना इतक्या जवळून पाहत होते. तर, या परदेशी पाहुण्यांनाही भारतीय रितीरिवाज आणि परंपरांचा पहिल्यांदाच आनंद घेता आला. हिमाचल प्रदेशाचं सौंदर्य पाहून तर हे परदेशी पाहुणे हरखून गेले होते.

Follow Us
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण
निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर...; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं...
CJI Surya Kant : निर्णयाशी असहमती म्हणजे संस्थेवर प्रश्नचिन्ह नव्हे; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं महत्त्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले? 
बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी....
Bisleri : बिसलेरीचं पाणी खरंच असुरक्षित? FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी; कंपनीने काय दिलं स्पष्टीकरण
13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा
NSEL Scam : 13 वर्षांची प्रतीक्षा संपणार; NSEL प्रकरणात 1,950 कोटींच्या परताव्याचा मोठा निर्णय
सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची
Gold Sliver Price Today : सोनं महागलं, चांदीचे दर जैसे थे; सोन्याच्या तोळ्यामागे एवढ्या रुपयांची वाढ, खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?