AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Mecca pact : मोठी बातमी, मित्र मार खातोय, वाचवण्यासाठी पाकिस्तान कुठल्याही क्षणी युद्धात उतरणार

Pakistan Mecca pact : पाकिस्तान युद्धात उतरु शकतो. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीच हे संकेत दिले आहेत. "आम्ही अलर्ट मोडवर आहोत. मक्का करारातंर्गत मदत करणं आमची जबाबदारी आहे"

Pakistan Mecca pact : मोठी बातमी, मित्र मार खातोय, वाचवण्यासाठी पाकिस्तान कुठल्याही क्षणी युद्धात उतरणार
Mecca pact
| Updated on: Sep 09, 2026 | 4:17 PM
Share

मागच्या आठवड्याभरापासून सौदी अरेबिया हुती बंडखोरांकडून मार खात आहे. मंगळवारी 8 सप्टेंबरला सौदीच्या चार शहरांवर एकाचवेळी हुती बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात सौदीचे 73 लोक जखमी झाले. त्यांच्या तेल व्यापारावर परिणाम झाला आहे. प्रतिदिन 4 लाख बॅरल तेल निर्यात व्हायचं. ते पूर्णपणे ठप्प झालं आहे. मात्र, या कठीण काळात सौदी अरेबियाला पाकिस्तान किंवा तुर्की कोणीही सहकार्य केलेलं नाही. त्यावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच वक्तव्य आलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यानुसार, सौदीला वाचवण्यासाठी पाकिस्तान मध्य पूर्वेच्या युद्धात उडी घेऊ शकतो.

सौदीवर हुती बंडखोरांचे असेच हल्ले सुरु राहिले, तर आम्ही युद्धात उतरु शकतो असं आसिफ म्हणाले. सौदीवर हुती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे मक्का करार लागू झाला आहे, असं ख्वाजा यांनी सांगितलं. “आम्ही अलर्ट मोडवर आहोत. मक्का करारातंर्गत मदत करणं आमची जबाबदारी आहे. यावर कोणी संशय घेऊ नये” असं ख्वाजा आसिफ म्हणाले.

काय आहे इस्लामिक नाटो?

सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कीने अलीकडेच मक्का करारावर स्वाक्षरी केली. या करारातंर्गत कुठल्या देशावर हल्ला झाला तर या तीन देशांवर हल्ला मानला जाईल. यात संयुक्त युद्ध अभ्यासाचाही उल्लेख आहे. त्या शिवाय जगातील अन्य देशांपर्यंतही विस्ताराचा मुद्दा आहे. मक्का करार नाटोच्या धर्तीवर तयार केला आहे. या करारात सहभागी होणारे देश आपलं संरक्षण बजेट आणि गोपनीय माहिती परस्परांसोबत शेअर करतील. याला इस्लामिक नाटोही म्हटलं जातं.

पाकिस्तानने काय शब्द दिलाय?

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार सौदी अरेबियात पाकिस्तानचे 8 हजार जवान तैनात आहेत. पण पाकिस्तानने हुती बाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचवर्षी पाकिस्तानने या जवानांना सौदीच्या रक्षणासाठी पाठवलं होतं. सौदी अरेबिया आणि तुर्कीच्या रक्षणासाठी पाकिस्तान 80 हजार जवान तैनात करु शकतो. पाकिस्तानने या देशांना अणवस्त्र सुरक्षा देण्याचाही शब्द दिला आहे.

Follow Us
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?