
इराण आणि अमेरिका युद्ध अधिक घातक होत आहे. इराण अधिक घातक बनला आहे. इराणकडून आता थेट आखाती देशांमधील गॅस आणि तेल रिफायनरीला टार्गेट केले जात आहे. कतारमध्ये मोठा घातक हल्ला इराणकडून करण्यात आला. एलपीजी गॅसच्या प्रकल्पावर हा हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात थेट प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. याच एलपीजी प्रकल्पाहून भारतात 47 टक्के गॅस येतो. इराणचा हा हल्ला भारतासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. फक्त कतारच नाही तर आखाती देशातील तेल रिफायनरीला इराणकडून टार्गेट केले जात आहे. भारतात अगोदरच एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला, त्यामध्येच भारताची झोप उडवणारी बातमी पुढे आली. आता हे युद्ध तेलावर जाऊन पोहोचले आहे. युद्ध लवकर थांबवणार नसल्याचे अगोदरच अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामध्येच आता हे युद्ध अधिक घातक होत आहे आणि जग या युद्धात होरपळत आहे.
मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्ध आता बदलले असून थेट 24 तासांपासून तेल युद्धात याचे रूपांतर झाले. कारण ऊर्जा हा या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे आणि आता थेटपणे ऊर्जा ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. ऊर्जा ठिकाणांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. इराण आता या युद्धात पेटून उठल्याच बघायला मिळत आहे.
इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला. त्यामुळे आता इराणकडूनही थेट आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले जात आहेत. मध्य पूर्वेतील संघर्षाला एक मोठे वेगळे वळण लागल्याचे बघायला मिळत आहे. खाडी देशांच्याखाली गॅसचे मोठे भांडार आहे. ते इराण आणि कतारमध्ये विभागलेले आहे.
इराणच्या आखाती किनाऱ्यावर असलुयेहजवळ असलेल्या या गॅस क्षेत्राशी संबंधित सुविधांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर इराणने थेट धमकी दिली आणि कतारच्या गॅस प्रकल्पाला टार्गेट करत हल्ला केला. आता स्थिती अधिक भयंकर बनली असून हे सर्व थांबवण्याची मागणी केली जात आहे. इराणकडून त्यांच्या गॅस क्षेत्राशी संबंधित सुविधांवर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याचा बदला म्हणून कतार आणि यूएईवर प्रतिहल्ला करण्यात आला.