Israel Election Result 2026 : बहुचर्चित इस्रायलमधील निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर पण सत्तेच्या चाव्या अमेरिकेच्या हातात

Israel Election Result 2026 : इस्रायलमधील बहुचर्चित निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे.या निवडणुकीच वैशिष्ट्य असं आहे की, सत्तेच्या चाव्या अमेरिकेच्या हातात आहेत. तु्म्ही म्हणाल निवडणूक इस्रायलची अमेरिका कसं ठरवणार, पण त्यामागचं राजकारण समजून घ्या.

Israel Election Result 2026 : बहुचर्चित इस्रायलमधील निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर पण सत्तेच्या चाव्या अमेरिकेच्या हातात
benjamin netanyahu- gadi eisenkot
| Updated on: Oct 30, 2026 | 7:46 AM

इस्रायलमध्ये 27 ऑक्टोंबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. काल मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते आकडे समोर आले. विद्यमान पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीच्या आघाडीला 53 जागा मिळाल्या, तेच नेतन्याहू यांच्यासमोर आव्हान निर्माण करणारे माजी सैन्य प्रमुख गादी आयजनकोट यांच्या आघाडीला 48 जागा मिळाल्या. इस्रायली संसदेला नेसेट म्हणतात. 120 सदस्यांच्या नेसेटमध्ये बहुमतासाठी 61 जागा आवश्यक आहेत.

पण नेतन्याहू यांच्या आघाडीला 52 जागा आणि विरोधी पक्षात असलेल्या आयजनकोट यांच्या आघाडीला 48 जागा मिळाल्या. म्हणजे कुठल्याही आघाडीला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. अरब पक्षांनी 19 जागा जिंकल्या आहेत. इस्रायलमधील या निवडणुकीत अरब पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहेत.

Loading...

कुठल्या पक्षाला किती जागा?

नेतन्याहू समर्थक गटाला (दक्षिणपंथी आघाडी) 53 जागा मिळाल्या आहेत. नेतन्याहू यांची लिकुड पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्या पक्षाला सर्वाधिक 27 जागा मिळाल्या आहेत.

आयजनकोट यांच्या विरोधी पक्षाच्या आघाडीला 48 जागा मिळाल्या आहेत. आयजनकोट यांच्या याशर पक्षाने 21 जागा जिंकल्या आहेत.

अरब पक्षांचं नेतृत्व करणाऱ्या आघाडीला 19 जागा मिळाल्या आहेत. अरब पक्षांसाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे.

निवडणुकीत परदेशी हस्तक्षेपाचा आरोप

त्रिशंकू संसदेत 19 जागा जिंकणारे अरब पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. इस्रायलच्या पारंपारिक राजकारणात बहुतांश यहुदी पक्ष अरब पक्षांसोबत आघाडी करणं टाळतात. या निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाने अरब पक्षांवर निवडणुकीत गडबड केल्याचा आणि परदेशी हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. सेंट्रल इलेक्शन कमिटीचे कार्यकारी महासंचालक डीन लिवने यांनी हे आरोप फेटाळून लावले असून निवडणुका पूर्णपणे वैध आणि पारदर्शक असल्याचं म्हटलं आहे.

व्हाइट हाऊसची भूमिका महत्वाची

नेतन्याहू आणि आयजनकोट यांनी परस्पराच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण आता ते एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात. यामध्ये व्हाइट हाऊसची भूमिका महत्वाची राहणार आहे. कारण इस्रायलच्या राजकारणात अरब पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा इतिहास आहे. पश्चिम आशियाचं राजकारण लक्षात घेता इस्रायलमध्ये इराण विरोधी सरकार अमेरिकेच्या हिताच आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहू आणि आयजनकोट यांच्यात समेट घडवून आणू शकतात. नेतन्याहू आणि आयजनकोट यांचे पक्ष वेगळे असेल तरी त्यांच्या विचारधारेत समानता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us