Israel-Hamas War | भयानक, इस्रायलचा भीषण Air Strike, एकाच कुटुंबातील 19 जण ठार

Israel-Hamas War | इस्रायल-हमास युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललय. त्याचवेळी या युद्धात अनेक निरपराध नागरिक मारले जात आहेत. इस्रायली सैन्य उत्तर गाझामध्ये घुसलय. एकाचवेळी जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही ठिकाणांहून हवाई हल्ले होतायत. दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यासाठी हे हल्ले होत असले, तरी त्यात निष्पापांचा बळी जातोय.

Israel-Hamas War | भयानक, इस्रायलचा भीषण Air Strike, एकाच कुटुंबातील 19 जण ठार
Israel-Hamas War
| Updated on: Nov 01, 2023 | 10:59 AM

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये मागच्या 25 दिवसांपासून भीषण युद्ध सुरु आहे. हे युद्ध कधीपर्यंत चालेल, या बद्दल कोणीच सांगू शकत नाही. गाझा पट्टीवर इस्रायलकडून सातत्याने हल्ले सुरु आहेत. गाझामध्ये आतापर्यंत 8500 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय. इस्रायली एअर फोर्सने मंगळवारी उत्तर गाजाच्या जबालिया रिफ्यूजी कॅम्पवर भीषण हवाई हल्ला केला. यात 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. 150 पेक्षा जास्त जखमी झाले. कॅम्प पूर्णपणे उद्धवस्त झाला. या हल्ल्यात अल जजीराच्या एका इंजिनिअरने आपल्या कुटुंबातील 19 सदस्यांना गमावलं. मोहम्मद अबू अल-कुमसन हे अल जजीरामध्ये ब्रॉडकास्ट इंजीनियर होते. इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये त्यांच्या कुटुंबातील 19 सदस्यांचा मृत्यू झाला. अल जजीराने जबालिया शरणार्थी शिबरावरील इस्रायलच्या हवाई हल्ल्याचा निषेध केलाय.

या हल्ल्यात मोहम्मदचे वडील, त्याच्या दोन बहिणी, आठ भाचे, भाच्या, भाऊ, त्याची पत्नी आणि चार मुलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर गाझामध्ये घनदाट लोकवस्तीच्या भागात जबालिया शरणार्थी शिबिर आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर या भागात सगळच उद्धवस्त झालय. या हल्ल्यात 50 लोकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी झालेत. उत्तर गाझामध्ये हमासच्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे. दहशतवादी कारवायांसाठी या जागेचा वापर सुरु होता, असं इस्रायलने म्हटलय. हमासने बांधलेले बोगदे आणि शस्त्र आणण्याचे एन्ट्री पॉइंट सुद्ध नष्ट करण्यात आले आहेत. युद्ध सुरु झाल्यानंतर उत्तर गाझामधून आतापर्यंत 8 लाख लोकांनी पलायन केलय. मागच्या काही दिवसात 300 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं आहे.

‘हे अमानवीय आहे’

जबालिया रिफ्यूजी कॅम्पवरील या हल्ल्यासाठी सौदी अरेबिया, इजिप्त आणि जॉर्डनने इस्रायलचा निषेध केलाय. नागरिक असलेल्या ठिकाणांवर इस्रायल हल्ले करतोय, असं सौदी अरेबियाने म्हटलय. इजिप्तने या हवाई हल्ल्यांना अमानवीय ठरवलय. हे असे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन आहे असं इजिप्तच म्हणणं आहे. इस्रायल सतत हॉस्पिटल, शरणार्थी शिबिरांवर हल्ले करतोयय. इजिप्तने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय.