एक मृतदेह ठेवण्यासाठी जमिनीखाली वसवलं अख्ख शहर, 7 किमीचं भुयार अन्…, आत जे सापडलं ते पाहून सर्वच हादरले, Video

हे सात किलोमीटर लांब आणि 25 मिटर खोल भुयार असून, या भुयारामध्ये एक अख्ख छोटं शहर वसवण्यात आलं आहे, मात्र हे शहर का वसवण्यात आलं, याच कारण समोर येताच आता खळबळ उडाली आहे.

एक मृतदेह ठेवण्यासाठी जमिनीखाली वसवलं अख्ख शहर, 7 किमीचं भुयार अन्..., आत जे सापडलं ते पाहून सर्वच हादरले, Video
गाझामध्ये भुयार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2025 | 6:11 PM

इस्रायल आणि गाझामध्ये युद्धविराम झाला आहे, आता या युद्धविरामानंतर इस्रायलच्या सैन्यदलाकडून गाझामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच इस्रायलच्या सैन्याला रफामध्ये एका मोठं भुयार सापडलं आहे. हे भुयार तब्बल सात किलोमीटर लांब असल्याचा दावा इस्रायलच्या आर्मीकडून करण्यात आला आहे. हे भुयार गाझाच्या ज्या भागामध्ये शरणार्थीचे कॅम्प, मुलांच्या शाळा आणि हॉस्पिटल होते, त्या भागामध्ये आढळून आले आहे. या भुयाराबाबत आता इस्रायलकडून मोठा दावा करण्यात आला आहे. याच भुयारामध्ये हमासने त्यांचा लेफ्टनंट हदार गोल्डिन याचा मृतदेह ठेवला होता, असं इस्रायलने म्हटलं आहे. 2014 साली इस्रायल आणि हमासमध्ये झालेल्या युद्धामध्ये गोल्डिन यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आता झालेल्या करारानुसार हमासने गोल्डिन याचा मृतदेह इस्रायलला दिला आहे.

इस्रायलच्या सैन्याकडून गुरुवारी एका भुयाराचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, हा व्हिडीओ शेअर करत इस्रायलच्या आर्मीने म्हटलं आहे की, हमासचं सात किलोमीटर लांब भुयार आम्ही शोधून काढलं आहे. याच भुयारामध्ये हमासने लेफ्टनंट हदार गोल्डिन याचा मृतदेह ठेवला होता, सर्च ऑपरेशन दरम्यान हे भुयार शोधण्यात आलं आहे.

जमिनीच्या खाली छोटं शहर

याबाबत माहिती देताना इस्रायलच्या सैन्यानं सांगितलं की, हे भुयार जवळपास सात किलोमीटर लांब आहे, आणि 25 मिटर खोल आहे. या भुयारामध्ये जवळपास 80 खोल्या असून, शैचालयापासून ते हॉस्पिटलपर्यंत सर्वात सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच शस्त्र, आस्त्र ठेवण्यासाठी देखील या भुयारामध्ये अनेक गुप्त जागा तयार करण्यात आल्या आहेत.

 

इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही वर्षांपासून भीषण युद्ध सुरू होतं, या युद्धामध्ये गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी स्थलांतर केलं आहे, तर या युद्धामध्ये हजारो लोकांचे बळी गेले आहेत. शेवटी आता इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर इस्रायलने सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.