AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : इस्त्रायल, इराण युद्धामध्ये आता रशियाची एन्ट्री, पुतिन यांचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन, अन्…

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका, इराण,इस्त्रायल युद्धामध्ये आता रशियाची एन्ट्री झाली आहे, रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आंनी थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन केला आहे.

Iran Israel War : इस्त्रायल, इराण युद्धामध्ये आता रशियाची एन्ट्री, पुतिन यांचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन, अन्...
putin (Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 4:52 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. याचदरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांना फोन केला आहे. यावेळी त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे हे युद्ध थाबलं पाहिजे असं आव्हानही त्यांनी यावेळी इराणच्या राष्ट्रपतींना केलं आहे. युद्धाचा मार्ग सोडून चर्चेने हा प्रश्न सोडवला जावा असं वाटत असल्याचं यावेळी पुतिन यांनी म्हटलं आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, सध्या मध्य पूर्वेत जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर आपण सात्यानं गल्फ को ऑपरेशन कॉन्सिल Gulf Cooperation Council च्या संपर्कात असल्याचंही यावेळी पुतिन यांनी स्पष्ट केलं.

तर दुसरीकडे इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्याची माहिती पुतिन यांना दिली आहे. यावेळी बोलताना पुतिन यांनी म्हटलं आहे, की या यु्द्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे आता युद्ध थांबवून प्रश्न चर्चेद्वारे सोडवले जावेत, अशी आमची भूमिका आहे, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

इराणने मानले आभार

दरम्यान रशियाने पाठिंबा दिल्याबद्दल इराणने रशियाचे आभार मानले आहेत. याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. रशियाने जो पाठिंबा दिला जी भूमिका घेतली त्याबद्दल इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी रशियाचे आभार व्यक्त केल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे इस्त्रायने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलच्या सैन्याकडून इराणच्या तेहरान आणि इस्फहान शहरांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे, अजूनही एअस्ट्राईक सुरू असून, तेथील पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा