युद्धात इराणला मिळाला आता बलाढ्य देशाचा पाठिंबा; इस्रायलचं टेन्शन वाढलं, अमेरिकेला मोठा धक्का

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेमधील तणाव चांगलाच वाढला आहे. मात्र याच दरम्यान आता इस्रायला मोठा धक्का बसला आहे, तर इराणचं पारडं जड होताना दिसत आहे.

युद्धात इराणला मिळाला आता बलाढ्य देशाचा पाठिंबा; इस्रायलचं टेन्शन वाढलं, अमेरिकेला मोठा धक्का
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2025 | 8:44 PM

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेमधील तणाव चांगलाच वाढला आहे. मात्र याच दरम्यान आता इस्रायला मोठा धक्का बसला आहे, तर इराणचं पारडं जड होताना दिसत आहे. अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या चीनने या वादात आता मोठं पाऊल उचललं आहे. चीन या युद्धात इराणसोबत उभा राहिला आहे. इस्रायलकडून सुरू असलेली ही कारवाई विनाशकारी असल्याचं चीनने म्हटलं आहे.चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना फोन केला आहे. यावेळी चीनने इस्रायलकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध करत ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी इराणच्या पराराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना इस्रायलकडून सुरू असलेल्या या हल्ल्यांबाबत माहिती देताना म्हटलं की, इस्रायलकडून जे हल्ले सुरू आहेत, त्यामध्ये इराणच्या लष्करासोबतच सामान्य नागरिकांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला करून, इस्रायलने अंतराष्ट्रीय कायद्याचं गंभीर उल्लंघन केलं आहे, इस्रायलकडून ज्या पद्धतीचे हल्ले होत आहेत, त्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र युद्धाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे, असं यावेळी अराघची यांनी म्हटलं आहे.

‘इराणला आपलं संरक्षण करण्याचा हक्क’

या हल्ल्यांचा चीनकडून निषेध करण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, आम्ही इरणाच्या सुरक्षा आणि अखंडता या अधिकारांचं समर्थन करतो. आम्ही इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांचा निषेध करतो. या संदर्भात ग्लोबल टाइम्सकडून देण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार चीनच्या पराराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे की, इस्रायलकडून इराणच्या सैन्य अधिकाऱ्यांना टार्गेटकरून क्रूर हल्ला करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा हल्ल्यांचं समर्थन होऊ शकत नाही, या हल्ल्यामध्ये इराणच्या अनेक सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही इराणचं खुलेपणानं समर्थन करत आहोत. आम्ही इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांचा निषेध करतो. आम्ही न्यायाच्या बाजुने उभे आहोत. दरम्यान चीनच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेची देखील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.