इस्रायलच्या एका चुकीचा परिणाम संपूर्ण जगावर, एकच हाहाकार, थेट हवाई..
इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता इस्त्रायलकडून खळबळ उडवणारे पाऊस उचलण्यात आले. इस्त्रायलच्या या पावलामुळे युद्ध अधिक भडकण्याचे मोठे संकत आहेत.

अमेरिकेने इराणभोवती नाकेबंदी केल्याने इराण पार वैतागला आहे. इराणच्या बंदरातून एकही जहाज निघू शकत नाहीये. थेट अमेरिकेने त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, होर्मुजमध्ये आमची नाकेबंदी कायम राहणार. आता इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तान दाैऱ्यावर पोहोचले आहे. युद्धबंदी करारात आपण अमेरिकेला थेटपणे बोलणार नाही, त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले. आता पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे बघायला मिळत आहे. जगाला शांती हवी असतानाच इस्त्रायल काही शांत बसत नाही. इस्त्रायलकडून लेबनॉनवर मोठा हल्ला करण्यात आला. इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यात तीन आठवड्यांकरिता युद्धविराम वाढवण्यात आला. मात्र, इस्त्रायली सैन्य आणि हिजबुल्लाह यांच्यात लढाई सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच इस्त्रायलच्या संरक्षण दिलाने मोठा खुलासा केला, ज्याने पुन्हा एकदा तणाव वाढणार असल्याचे स्पष्ट झाले.
इस्रायल संरक्षण दलाने सांगितले की, त्यांनी दक्षिण लेबनॉनमधील काफरा आणि याटर या शहरांमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ले केले. हिजबुल्लाहचे इस्रायली सैनिक आणि नागरिकांसाठी धोका निर्माण करत आहेत. मात्र, इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्यांनंतर तणाव पुन्हा एकदा वाढल्याचे बघायला मिळाले. युद्धविराम तीन आठवड्यांकरिता वाढवल्यानंतर इस्त्रायलकडून हा हल्ला करण्यात आला.
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यानंतर सांगितले की, दक्षिण लेबनॉनमध्ये झालेेल्या हवाई हल्ल्यात सहा जण ठार झाले आहे. दोघेजण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हिजबुल्लाहने असा आरोप केला की, दक्षिण लेबनॉनमधील काही घरे इस्रायली सैनिकांनी उद्ध्वस्त केल्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायली सैन्याला टार्गेट करण्यात आले.
इराणने लेबनॉनमध्ये होणाऱ्या इस्त्रायली हल्ले रोखण्यासाठी युद्धविरामाची मागणी केली होती. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसंधी झाल्यानंतर लेबनॉनवर इस्त्रायलने हल्ले वाढवले. ज्याचा विरोध इराणकडून करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये, उलट तणाव अधिक वाढताना दिसत आहे. होर्मुज खाडीतही तणाव वाढला आहे. जहाजांवर मोठी कारवाई केली जात आहे.