जगाला ज्याची भीती तेच घडले, इराण-अमेरिका युद्धात थेट या देशाची एन्ट्री?, थेट इस्त्रायलच्या..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती बघता युद्ध अधिक भडकण्याचे मोठे संकेत आहेत. थेट या युद्धात अजून एका देशाने उडी घेतल्याचा दावा करण्यात आला. इस्त्रायलच्या सैन्याने गंभीर आरोप केले.

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराण-अमेरिका युद्धात थेट या देशाची एन्ट्री?, थेट इस्त्रायलच्या..
Iran US war
| Updated on: Mar 28, 2026 | 11:58 AM

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. एका भयानक युद्धाला सुरूवात झाली. जागतिक बाजारात तीनतेरा वाजले आहेत. सतत कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, त्यावर कोणीही नियंत्रण ठेऊ शकत नाही. एका वेगळ्या धोक्यात जग आहे. यादरम्यानच अमेरिकेवर युद्ध थांबवण्याकरिता मोठा दबाव आहे. मात्र, आता युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात असतानाच एक अत्यंत खळबळजनक बातमी पुढे आली. आता इराण आणि अमेरिका युद्ध वाढताना दिसत आहे. इस्त्रायलच्या सैन्याने केलेल्या दाव्याने जगाची झोप उडाली. इस्त्रायल सैन्याने दावा केला की, यमनमधून इस्त्रायलवर मिसाईल टाकली जात आहेत. ही पहिली वेळ आहे की, थेटपणे यमनचे नाव पुढे आले.

हे हल्ले होण्यापूर्वी काही तास अगोदरच हूतीने संकेत दिले होते की, इराण विरोधातील कारवाई वाढली तर आम्ही यामध्ये हस्तक्षेप करू. इस्त्रायलकडून करण्यात आलेले आरोप यमनने थेटपणे स्वीकार केले नाहीत. इस्त्रायलच्या सैन्याच्या रिपोर्टनुसार, इस्त्रायलच्या बीयर शेबा शहराच्या आसपास सायरन वाजले आहेत. हा भाग इस्त्रायलकरिता अत्यंत महत्वाचा आहे.

हूती विद्रोही गेल्या अनेक वर्षांपासून इराणच्या जवळचे मानले जातात. आता थेट या युद्धात त्यांनी उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. इराणवरील हल्ले अधिक घातक झाले तर आम्ही उतरून आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर काही तासातच इस्त्रायलच्या सैन्याकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला. आतापर्यंत तरी इराण, इस्त्रायल आणि अमेरिका असे युद्ध सुरू होते.

पण जर अजून कोणते देश या युद्धात उतरले तर याचे अत्यंत घातक परिणाम होऊ शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष गेल्या काही दिवसांपासून या युद्धात अनेक देशांची मदत मागत आहेत. पण एकही देश मदतीला पुढे येत नाही. जर खरोखरच या युद्धात यमन उतरला असेल तर ही जगाकरिता अत्यंत धोक्याची घंटा आहे. इस्त्रायलने केलेल्या दाव्यावर इराणकडून बोलणे टाळण्यात आले.

Follow Us