Israel Attack in Gaza : भयानक, इस्रायलने युद्धात AI टेक्निक वापरली, UN च्या वक्तव्याने मोठी खळबळ

इस्रायलने युद्धात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर सुरु केला आहे. ही खूप गंभीर आणि मोठी बाब आहे. युद्धात अशी टेक्नोलॉजी वापरणारा इस्रायल पहिला देश ठरला आहे. इस्रायलकडून कुठल्या AI टेक्निकचा वापर सुरु आहे? त्यामुळे किती नुकसान होतय? या बद्दल जाणून घ्या.

Israel Attack in Gaza : भयानक, इस्रायलने युद्धात AI टेक्निक वापरली, UN च्या वक्तव्याने मोठी खळबळ
israel using artificial intelligence technology in warImage Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 1:04 PM

मागच्या सहा महिन्यापासून गाजा पट्टीत युद्ध सुरु आहे. इस्रायल आपल्या शत्रुची माहिती मिळवतोय. त्या आधारावर टार्गेट निवडून ते नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करतोय. इस्र्याली सुरक्षेशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गास्पेल नावाने एक AI सिस्टम विकसित केली आहे. गास्पेल सिस्टमद्वारे डिजिटल डेटा, ड्रोन फ़ुटेज, सॅटेलाइट इमेज, कॉल रेकॉर्ड्स, सोशल मीडिया आणि अन्य मार्गाने उपलब्ध माहितीच्या आधारावर टार्गेटची निवड केली जाते. AI टेक्निकने एका दिवसात 100 टार्गेटची निवड करण शक्य आहे. सामान्यत: कुठल्याही सैन्यासाठी ही अशक्य अशी गोष्ट आहे. त्याशिवाय इस्रायली सैन्याकडे Lavender नावाच दुसरा AI प्रोग्राम उपलब्ध आहे. इस्रायली सैन्य युद्ध क्षेत्रात Lavender चा वापर करतय.

इस्रायलमधील रहस्यमयी आणि शक्तिशाली इंटेलिजेंस यूनिट 8200 च्या चीफने लिहिलेलं पुस्तक सध्या चर्चेत आहे. The Human Machine team नावाने लिहिलेल्या या पुस्तकातून युद्धात आर्टिफिशियल इंटेलिजेंस बद्दल विस्ताराने माहिती मिळते. इस्रायली इंटेलिजेंस चीफने हे पुस्तक वर्ष 2021 मध्ये लिहिल होतं. इस्रायली सैन्याच्या AI प्रयोगानंतर सगळ्यांच या पुस्तकाकडे लक्ष गेलं.

AI सिस्टिमच्या डेटामध्ये कुठली माहिती असते?

लेखक म्हणून ब्रिगेडियर जनरल वाय.एस असं त्यांनी आपल नाव सांगितलय. इस्रायली इंटेलिजेंस चीफनुसार, टार्गेटची निवड करणारी AI मशीन या गोष्टी सुद्धा आपल्या डेटामध्ये ठेवते. कुठला व्यक्ती आपला मोबाइल फोन किंवा फोन नंबर बदलतोय. सारख-सारख लोकेशन किंवा एड्रेस बदलतोय. याची सगळी माहिती AI सिस्टिमला कळते.

AI सिस्टम भले टार्गेट निवडते, पण….

इस्रायली डिफेंस फोर्सनुसार, AI सिस्टम भले टार्गेट निवडत असेल, पण अंतिम निर्णय वरिष्ठ सैन्य अधिकारीच घेतात. अलीकडेच इस्रायलच्या बॉम्ब वर्षावात आंतरराष्ट्रीय संस्थेशी संबंधित कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर IDF च्या निर्णयावर जगभरातून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.