पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, थेट इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मानले भारताचे आभार, म्हणाले, मित्राचा…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाने जगाचे टेन्शन वाढले. इराण आणि इस्त्रायल एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. या युद्धादरम्यान धक्कादायक व्हिडीओही व्हायरल होत आहेत. अमेरिकेने आपल्या नागरिकांना अलर्ट जारी केला.

पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, थेट इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मानले भारताचे आभार, म्हणाले, मित्राचा...
Narendra Modi and Benjamin Netanyahu
| Updated on: Mar 03, 2026 | 1:40 PM

अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहे. इराणकडूनही जोरदार हल्ले केली जात आहेत. इराण आणि इस्त्रायलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, दोन्ही देशातील नागरिक बंकरमध्ये लपून बसली आहेत. शाळांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणमध्ये एका दिवसात 90 पेक्षा जास्त लोकांचा जीव हल्ल्यात गेला. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला 4 दिवस पूर्ण झाली आहेत. मात्र, परिस्थिती अधिक भयंकर दिसतंय. दणादण क्षेपणास्त्र डांगली जात आहेत. ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्ये इराण मोठे हल्ले करत आहे. इस्त्रायलवर असंख्य क्षेपणास्त्र हल्ले इराणकडून करण्यात आली. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबवण्याची भूमिका घेतली. भारत आणि इस्त्रायलचे संबंध अत्यंत जुने आणि खास आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर होते. इस्त्रायलच्या संसदेत त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला. काही संरक्षण करार महत्वाची यादरम्यान झाली.

इराण आणि इस्त्रायल युद्ध सुरू असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन करून संवाद साधला होता, याबाबतची माहिती नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासोबत माझा बराचवेळ फोनवर संवाद झाल्याचे म्हटले आणि आभारही व्यक्त केले.

बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत संवाद साधत म्हटले की, मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो. माझ्यात आणि त्यांच्यात बऱ्याचवेळ फोनवर चर्चा झाली. या काळात इस्त्रायलच्या मागे उभे राहिल्याबद्दल मी भारताचे आभार मानतो. मात्र, नेतान्याहू यांनी फोनवर नक्की काय चर्चा झाली हे सांगणे टाळले.

भारत आणि इराणचे संबंधही चांगले आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीला भारताने हे युद्ध थांबवावे असे म्हटले आहे. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहणार आहे. सध्या या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. शिवाय सतत हल्ले सुरू असल्याने दोन्ही देशातील नागरिकांचे मोठ्या संख्येत जीव जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us