इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले भारताबद्दल खळबळजक विधान, थेट भारताला..
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. मात्र, आता इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात संबंध ताणले आहेत. त्यामध्येच आता इस्त्रायलने भारताचे नाव घेत एक धक्कादाक विधान केले. ज्याने मोठी खळबळ उडाली.

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला. जवळपास 3 महिने हे युद्ध सुरू होते. आता हे युद्ध थांबले आहे. मात्र, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात काही गोष्टींवरून मतभेद झाल्याचे दिसतंय. नुकताच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेला भारताचे नाव घेत मोठा आरसा दाखवला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या दाव्याला खोटा सांगितले. इस्त्रायलचा समर्थक फक्त वॉशिंग्टनच नाही तर इतरही देश असल्याचे त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिकेत सुरू असलेले युद्धविराम करार यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत. इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकताच बोलताना भारताच्या समर्थनाबद्दल मोठे विधान केले. मात्र, यादरम्यानच त्यांनी भारताबद्दल वादग्रस्त विधान केले. भारताचे नाव घेत त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांना थेट उत्तर दिले.
बेंजामिन नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूज संडे ब्रीफिंगला बोलताना म्हटले की, इस्त्रायलचे अनेक देशांनी समर्थन केले. ज्यात भारत देखील आहे. भारत हा एक छोटा देश आहे. आमचे काही मित्र आहेत, त्यामध्ये भारतासारखा छोटा देशही आहे. तुम्हाला माहिती आहे का? तिथे 1.4 अरब लोक राहतात. खरे सांगू तर आम्हाला तिथून जबरदस्त समर्थन मिळाले आहे. मात्र, यादरम्यान बोलताना त्यांनी वारंवार भारताला छोटा देश असल्याचे म्हटले.
नेतन्याहू यांनी भारताला छोटा देश असल्याचे म्हटल्याने भारतीय लोकांना हे अजिबात पटले नाही. भारता हा जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारता अजिबात छोटा देश नसल्याने भारतीयांचे म्हणणे आहे. नेतन्याहू यांना भारत छोटा देश का दिसतो, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय लोक नेतन्याहू यांच्या या विधानानंतर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी व्हाईट हाऊसमधील एका ब्रिफिंगंध्ये बोलताना म्हटले होते की, इस्त्रायलने अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेचा सन्मान केला पाहिजे. ज्यानंतर इस्त्रायल नेते नाराज झाले. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम शांतता करारावर इस्त्रायल नाराज आहे. यावर एका इस्त्रायलच्या नेत्याने बोलताना म्हटले देखील होते की, मी जर इस्त्रायलच्या कॅबिनेटमध्ये नसतो तर मी यावर जोरदार टीका केली असतील.
अमेरिका आणि इस्त्रायल चांगले मित्र देश आहेत. मात्र, इराणसोबतच्या युद्धात त्यांचे संबंध ताणल्याचे बघायला मिळतंय. इस्त्रायलचे प्रधानमंत्री नेतन्याहू यांनी भारताबद्दल पुढे बोलताना म्हटले की, मला फेसबुकवर भारताचे समर्थन मिळत आहे. मात्र, नेतन्याहू यांनी भारताबद्दल केलेले भाष्य लोकांना अजिबात वाढत नाही.