
अमेरिका-इस्रायलने युद्ध पुकारल्यापासून इराणने हॉमुर्झ स्ट्रेट बंद करुन ठेवला आहे. परिणामी तिथून तेल आणि गॅसची वाहतूक होत नाहीय. भारताच्या विनंती नंतर इराणने तिथून भारताच्या तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी दिलीय. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक याच हॉमुर्झ स्ट्रेट मधून होते. हा समुद्री मार्ग बंद राहिल्यास जगासमोर तेल संकटाची समस्या अजून गंभीर होईल. म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Hormuz Strait च्या सुरक्षेसाठी आपल्या मित्र देशांना तिथे युद्धनौक पाठवण्याची विनंती केली होती. हॉमुर्झ स्ट्रेट मधून येणार्या तेलाच्या जहाजांना संरक्षण मिळावं हा त्यांचा उद्देश होता. अमेरिकेलाही हॉमुर्झची कोंडी फोडता येत नाहीय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आर-पारच्या मूडमध्ये आहेत. कोण-कोणते देश आमची विनंती धुडकावतात. आमच्या मदतीसाठी युद्धनौका पाठवत नाहीत ते मला पहायचय असं ट्रम्प म्हणालेत. जपानसह ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीने होर्मुज मध्ये आपल्या युद्धनौका पाठवायला नकार दिलाय.
युद्धाचा हा तिसरा आठवडा
होर्मुजमध्ये इराणने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांना युद्धनौका पाठवण्याचं आवाहन केलं होतं. होर्मुजवर लक्ष ठेवण्यासाठी अन्य देशांकडून सहकार्य मिळवण्यासाठी चर्चा सुरु आहे असं डोनाल्ड ट्रम्प एअरफोर्स वनमध्ये बोलताना बोलले. त्यांनी सांगितलं की, त्यांचं प्रशासन Hormuz Strait च्या सुरक्षेसाठी सात देशांसोबत चर्चा करत आहे. युद्धाचा हा तिसरा आठवडा आहे.क्षेत्रीय स्थिरता आणि जागतिक ऊर्जा बाजारावरील प्रभाव या मुद्यांवर त्यांनी भर दिला.
याचं उत्तर देणं कठीण
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेटमधून जहाजांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी वॉरशिप पाठवायला सांगितली आहे. पण आम्ही या ऑपरेशनचा विचार करत नाहीय असं जपानचं म्हणणं आहे. “अजूनपर्यंत तरी होर्मुज स्ट्रेटमध्ये जहाजांना सुरक्षा देण्यासाठी नौदल पाठवण्यासाठी अमेरिकेकडून अधिकृत विनंती पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे याचं उत्तर देणं कठीण आहे” असं जपानचे पंतप्रधान म्हणाले.
फ्रान्सची भूमिका काय?
दुसरीकडे एएफपीच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाने, ट्रम्प यांनी विनंती केली तरी होमुर्ज स्ट्रेट मध्ये युद्धनौका पाठवणार नाही असं म्हटलय. अमेरिकेचा नाटोमधील पार्टनर तुर्कीचे आधीच युद्धापासून हात झटकले आहेत. दक्षिण कोरिया मात्र गांभीर्याने विचार करतोय की, होर्मुज स्ट्रेटमध्ये आपली युद्धनौका पाठवायची की नाही?. फक्त जपान, तुर्की आणि ऑस्ट्रेलियाच नाही, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री कॅथरीन वॉट्रिन यांनी ट्रम्प यांच्या विनंतीचा विषय झटक्यात संपवला. ‘जो पर्यंत युद्ध वाढत जाईल, फ्रान्स हॉर्मुझ स्ट्रेटमध्ये आपल्या युद्धनौका नाही पाठवणार’ असं त्या म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा झटका आहे.