
बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसच्या भविष्यवाण्या लोकांमध्ये नेहमीच कुतुहूल निर्माण करतात. त्यांचे असंख्य घाबरणारे दावे खरे ठरले आहेत. त्यामुळे अख्खं जग हादरून गेलंय. आता अजून एक अशीच मोठी आणि घाबरवणारी भविष्यवाणी समोर आली आहे. जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रयो तत्सुकी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. रयो तत्सुकी यांना जपानचे बाबा वेंगा संबोधले जाते. रयो यांच्या मते जुलै 2025मध्ये जगात विनाशकारी आपत्ती येणआर आहे. ही आपत्ती आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक असणार आहे. विशेष म्हणजे रयो यांच्या भविष्यवाण्या यापूर्वीही खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता केलेली भविष्यवाणी कुणीही सहज घेताना दिसत नाहीये. सर्वांनीच त्यांची भविष्यवाणी गंभीरपणे घेतली आहे.
रयो तत्सुकी यांनी 1995मध्ये त्यांच्या डायरीत एक भविष्यवाणी लिहिली होती. 25 वर्षानंतर म्हणजे 2020मध्ये जगात एक रहस्यमयी व्हायरस येईल. एप्रिलमध्ये या व्हायरसचा हाहा:कार होईल. पण काही काळासाठी तो शांत होईल आणि 10 वर्षानंतर पुन्हा हा व्हायरस येईल, अशी भविष्यवाणी रयो यांनी केली होती. 2020मध्ये कोव्हिड व्हायरस आला आणि जगाला मोठा ताप झाला. त्यामुळे रयोच्या भविष्यवाणीकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं.
प्रिन्स डायना, कोबे भूकंप आणि त्सुनामी
रयो यांच्या सर्व भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 1991मध्ये त्यांनी फ्रेडी मर्करी यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर काही महिन्यानंतर मर्करीचा एड्सने मृत्यू झाला. 1995मध्ये त्यांनी भूकंपाचं स्वप्न पाहिलं होतं. जपानच्या कोबे शहरात नंतर भूकंप आला आणि त्यात सहा हजाराहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते.
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 1992मध्ये त्यांनी स्वप्नात एका महिलेची आकृती पाहिली. त्याखाली लिहिलं होतं… ‘Diana? Died?’ त्यानंतर बरोबर पाच वर्षानंतर 31 ऑगस्ट 1997 रोजी ब्रिटेनची प्रिन्सेस डायनाचा मृत्यू झाला होता.
2025मध्ये काय घडणार?
रयो यांच्या डायरीत असंख्य भविष्यवाण्या आहेत. त्यांनी जगाला या भविष्यवाण्यांमधून सावध केलं आहे. जुलै 2025च्या आसपास जगाला आणखी एका विनाशकारी संकटाचा सामना करावा लागू शकतो. जुलै 2025 मध्ये जगात एक मोठी त्सुनामी दिसेल. जपानमध्ये 2011मध्ये आलेल्या त्सुनामीहून तीनपट मोठी ही त्सुनामी असेल. या नैसर्गिक संकटाने केवळ जपानलाच फटका बसणार नाही तर फिलिपाईन्स, तैवान, इंडोनेशिया आणि इतर देशांनाही त्याचा फटका बसणार असल्याचं रियो यांनी म्हटलंय.
जपानच्या आसपासच ही त्सुनामी येमार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पण त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. यापूर्वी 26 डिसेंबर रोजी भारताने अशीच विनाशकारी त्सुनामी झेलली होती. ही त्सुनामी इंडोनियाच्या सागरी क्षेत्रात आलेल्या भूकंपामुळे निर्माण झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यात हाहा:कार उडाला होता.