ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना टरकली, सर्वात मोठा घातक प्लान तयार, काय आहे मोठा गेम?

Jaish-e-Mohammed : गुप्तचर अहवालात असेही म्हटले आहे की जमात अल-मुमिनत जैशसारख्या सेल-आधारित संरचनेवर काम करत आहेत. म्हणजेच वेगवेगळे छोटे गट भरती, निधी संकलन आणि सोशल मीडिया किंवा मदरशांद्वारे संदेश पसरवण्याचे काम करत आहेत. या सर्क्युलरच्या आधारे पाकिस्तानशी संबंधाचे ठोस पुरावे सापडले आहेत, असेही गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना टरकली, सर्वात मोठा घातक प्लान तयार, काय आहे मोठा गेम?
मोठा घातक प्लान तयार
| Updated on: Oct 09, 2025 | 12:06 PM

सीमेपलीकडून भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच आहे. एप्रिल महिन्यात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा कणाच मोडून काढला. मात्र, आता याच दहशतवादी संघटना भारताला पुन्हा अशांत करण्यासाठी नवीन युक्त्या शोधत आहेत. जैश-ए-मोहम्मदने (JeM) आता आपल्या ब्रिगेडमध्ये महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याअंतर्गत बुधवारी ( 8 ऑक्टोबर) जैशने दहशतवादी मसूद अझहरच्या नावाने एक पत्र जारी करून आपल्या महिला शाखेच्या स्थापनेची घोषणा केली. दहशतवादी संघटना जैशच्या या महिला शाखेचे नाव जमात-अल-मोमिनत असेल. बहावलपूरमधील मरकझ उस्मान-ओ-अली येथेही त्यांनी महिलांची भरती सुरू केली आहे.

जैशने अल-कलाम मीडिया या त्यांच्या प्रचार शाखेद्वारे जारी केलेल्या पत्राद्वारे माहिती दिली आहे की, जमात-अल-मोमिनतच्या महिला शाखेच्या प्रमुखपद हे दहशतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अझहरकडे सोपवण्यात आलं आहे.  भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैशच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात तिचा पती यूसुफ अजहर मारला गेला होता.  तसेच, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशने अलिकडेच बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर, मानसेहरा येथील त्यांच्या मरकझमध्ये शिकणाऱ्या गरीब महिलांना आणि त्यांच्या दहशतवादी कमांडरच्या पत्नींना दहशतवादी संघटनेच्या महिला शाखेत भरती केले आहे.

महिलांचे ब्रेनवॉश करणे आणि त्यांना त्यांच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. ही ब्रिगेड जैशच्या महिला शाखेच्या रूपात तयार करण्यात आली आहे, जी सायकॉलॉजिकल वॉरफेअर म्हणजेच म्हणजेच मनावर परिणाम करणारा प्रचार आणि ग्राऊंड लेव्हलवर भरती करण्याचे काम करते. या गटाच्या कारवाया सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि काही मदरशांच्या नेटवर्कद्वारे सतत सुरू आहेत. धर्माच्या नावाखाली महिलांना आकर्षित करणे आणि त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे हेच संघटनेचे ध्येय आहे.

सुशिक्षित महिलाही निशाण्यावर

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक रंग देण्यासाठी मक्का आणि मदिनाचे फोटो देखील जैशच्या या नवीन सर्क्युलरमध्ये लावण्यात आले आहेत. तसेच, या सर्क्युलरमध्ये अनेक भावनिक गोष्टीदेखील लिहिण्यात आल्या आहेत.  सुशिक्षित आणि शहरी मुस्लिम महिलांना निशाणा करत त्यांना प्रभावित करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत. महिलांच्या भावनांना हात घालणं आणि त्यांना त्यांच्या संघटनेच्या उद्देशाची जाणीव करून देण्यासाठी, या अभियानाद्वारे सर्व प्रयत्न केले जात आहेत.

ऑपरेशन सिंदूर नंतर जैशचे पाऊल

देवबंदी विचारसरणीने प्रभावित असलेला जैश ही संघटना महिलांनी शस्त्रे उचलणे, युद्धात जाणे किंवा सीमेवर सामील होणे याच्या पूर्णपणे विरोधात होती. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर बदललेल्या परिस्थितीत, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल सैफ यांनी महिलांनाही दहशतवादी व्यवसायात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या दहशतवादी संघटनांनी केला आहे महिलांचा वापर

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), बोको हराम, हमास आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) यांनी दहशतवादी कारवायांमध्ये महिलांचा वापर केला आहे. या संघटनांनी महिलांचा आत्मघाती बॉम्बर म्हणून वापर केला. पण जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांनी कधीही या कामासाठी महिलांचा वापर केला नाही. आता, ज्या पद्धतीने जैशने महिलांचे एक नवीन पथक तयार केले आहे, सूत्रांच्या माहितीनुसार, जैश या महिलांचा वापर आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी करेल अशी दाट शक्यता आहे