अमेरिका संकटात, भारत मदतीला धावून, थेट गुजरातच्या जामनगरहून जहाज रवाना, पुढील…

टॅरिफच्या मुद्यामध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. मात्र, त्यानंतरही भारताने अमेरिकेसोबतची मैत्री कायम ठेवली आहे. भारत आता अमेरिकेच्या मदतीला धावून गेल्याचे बघायला मिळतंय.

अमेरिका संकटात, भारत मदतीला धावून, थेट गुजरातच्या जामनगरहून जहाज रवाना, पुढील...
Jet fuel
| Updated on: Nov 18, 2025 | 8:29 AM

मागील काही दिवसांपासून भारत अमेरिकेतील संबंध चांगलेच तणावात बघायला मिळत आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा कितीतरी आठवडे पूर्णपणे बंद होती. मात्र, आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत आहेत. व्यापार करार देखील अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जाते. भारताने पहिल्यांदाच अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला जेट इंधन निर्यात केले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही शिपमेंट ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेवरॉनसाठी होती. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने अमेरिकेत जेट इंधन निर्यात केले आहे. यापूर्वी असे कधीही घडले नाही. डेटानुसार, लॉस एंजेलिसमधील इंधनाची कमतरता भरून काढण्यासाठी ही आयात करण्यात आली.

भारतातून अमेरिकेत अत्यंत मोठी आयात 

ऑक्टोबरपासून अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील जेट इंधनाचे उत्पादन कमी झाले होते. कॅलिफोर्नियातील शेवरॉन रिफायनरीला आग लागली. ज्यामुळे कंपनीला अनेक युनिट्स बंद करावे लागले. ही नुकसान भरून काढण्यासाठी भारतातून इंधन आयात करण्यात आले. हाफनिया कल्लांग नावाच्या टँकरवर अंदाजे 60,000 मेट्रिक टन जेट इंधन भरण्यात आले. हे जहाज 29 ऑक्टोबर दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरी येथून निघाले होते.

रिलायन्सने भाष्य करण्यास दिला नकार 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे जहाज लॉस एंजेलिसमध्ये पोहोचेल असे रिपोर्टनुसार कळतंय. रिलायन्सने यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाहीये. शेवरॉनच्या रिफायनरीचे दुरुस्तीचे काम 2026 च्या सुरुवातीला पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तोपर्यंत अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील जेट इंधनाचा पुरवठा कमी राहू शकतो. त्यामुळे जेट इंधनाची भारतातून अमेरिकेने आयात केली आहे. रिलायन्सच्या जामनगर प्रकल्पातून हे इंधन देण्यात आलंय.

अमेरिकेच्या मदतीला धावून आला भारत 

भारताच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत मोठा करार केला असून एलपीजी आयातीबद्दलचा हा करार आहे. 2026 पासून अमेरिका भारतात एलपीजी आयात करेल. भारताच्या वार्षिक आयातीच्या 10% आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेत मोठे करार होताना सध्या दिसत आहेत.