काबूल आणखी एका स्फोटानं हादरलं, इसिसचा रॉकेट हल्ला, 2 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

| Updated on: Aug 29, 2021 | 9:11 PM

अमेरीकेचे अध्यक्ष जो बिडेन (Biden on bomb blast) यांनी अशा हल्ल्याची कल्पना कालच दिलेली होती. काबूल एअरपोर्टवर पुढच्या 24 ते 36 तासात आणखी एक दहशतवादी हल्ला होऊ शकतो असं बिडेन म्हणाले होते. त्यानंतर बरोबर 24 तासाच्या आत हा हल्ला झालाय.

काबूल आणखी एका स्फोटानं हादरलं, इसिसचा रॉकेट हल्ला, 2 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती
kabul-
Follow us on

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एका मोठ्या स्फोटानं हादरलीय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS नं आठवड्याभरात सलग दुसरा हल्ला केलाय. एक रॉकेट काबूल एअरपोर्ट(kabul airport)च्या दिशेनं सोडण्यात आलं. अर्थात टार्गेटवर अमेरीकन सैनिक आणि जिथून अमेरीकन विमानं उड्डान भरतायत तो भाग होता. पण हे हल्ला करण्यात आलेलं रॉकेट लक्ष्य भेदू शकलं नाही. आणि ते रॉकेट जवळच्याच निवासी भागात कोसळलं. (Kabul rocked by another blast, ISIS rocket attack, 2 killed, numbers feared to rise)

शिन्हुआ ह्या वृत्तसंस्थेनुसार-काबूलच्या एअरपोर्टच्या जवळ रॉकेट हल्ला करण्यात आलाय. याच ठिकाणी अमेरीकन सैन्याची विमानं ये जा करतायत. पण रॉकेट लक्ष्यावर न पोहचता दुसरीकडेच भरकटलं आणि त्यामुळे या हल्ल्यात अमेरीकन हाणी कमी झाल्याची शक्यता आहे. हा हल्ला सुद्धा आयएसआयएस (ISIS)नेच केल्याची शक्यता वर्तवली जातेय.

बदल्याचं चक्र

इसिसिनं आधी काबूल एअरपोर्टवर हल्ला केला, ज्यात 169 अफगाण नागरीक आणि 13 अमेरीकन सैनिकांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून अमेरीकेनं इसिसिच्या ठिकाण्यांवर ड्रोन हल्ला केला (US drone strike). परत याचा बदला म्हणून इसिसिनं हल्ला केल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार दोन जणांना जीव गमवावा लागलाय. काही जण जखमी आहेत. मृत आणि जखमींमध्ये मुलं आणि महिलांचा समावेश आहे. एअरपोर्टकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून 1 कि.मी. अंतरावर हा हल्ला केला गेलाय.

बिडेन यांची चेतावणी

अमेरीकेचे अध्यक्ष जो बिडेन (Biden on bomb blast) यांनी अशा हल्ल्याची कल्पना कालच दिलेली होती. काबूल एअरपोर्टवर पुढच्या 24 ते 36 तासात आणखी एक दहशतवादी हल्ला होऊ शकतो असं बिडेन म्हणाले होते. त्यानंतर बरोबर 24 तासाच्या आत हा हल्ला झालाय. हा हल्ला होणार म्हणून सर्व अमेरीकन नागरीकांनी काबूल एअरपोर्टच्या परिसर सोडावा असा सल्लाही आधीच देण्यात आला होता. बिडेन म्हणालेत-काबूल एअरपोर्ट हे अतिरेक्यांचं टार्गेट झालेलं आहे. परिस्थिती धोकादायक बनत चाललीय. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याची शक्यता अधिक आहे. माझ्या कमांडर्सनी सुचित केलंय की पुढच्या 24 ते 36 तासात अतिरेकी हल्ला होऊ शकतो.

बॉम्बस्फोटनंतर ड्रोन अटॅक

काबूल एअरपोर्टवर आयएसआयएस- के(ISIS-K)ह्या दहशतवादी संघटनेनं गुरुवारी हल्ला केला. ह्या हल्ल्यात 169 अफगाण नागरीक तर 13 अमेरीकन सैनिकांचा मृत्यू झाला. अमेरीकेच्या अध्यक्षांनी ह्या घटनेचा बदला घेण्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासातच अफगाणिस्तानमध्ये अमेरीकेनं (US Drone Attack in Afghanistan)ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली. अमेरीकन मेजर जनरल हँक टेलरनं सांगितलं- आयएसआयएस चे दोन हायप्रोफाईल म्होरक्यांना मारण्यात यश आलंय आणि एक जखमी झालाय. यात कोणत्याही नागरीकाला इजा पोहोचलेली नाही. (Kabul rocked by another blast, ISIS rocket attack, 2 killed, numbers feared to rise)

इतर बातम्या

वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोमला Renault Kiger गिफ्ट, जाणून घ्या SUV ची किंमत आणि फीचर्स

ईडीची ‘100 कोटी वसुलीची नोटीस’, अनिल परब मात्र फार फार 60 शब्द बोलून निघून गेले