AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोमला Renault Kiger गिफ्ट, जाणून घ्या SUV ची किंमत आणि फीचर्स

रेनॉल्ट इंडियाने सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या बॉक्सर आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 ची ध्वजवाहक एम. सी. मेरी कोम (MC Mary Kom) हिला कायगर सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही (Kiger SUV) गिफ्ट केली आहे.

वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोमला Renault Kiger गिफ्ट, जाणून घ्या SUV ची किंमत आणि फीचर्स
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 8:36 PM
Share

मुंबई : रेनॉल्ट इंडियाने (Renault India) सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या बॉक्सर आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 ची ध्वजवाहक मंगटे चुंगनेइजँग मेरी कोमला (Mangte Chungneijang Mary Kom) कायगर सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही (Kiger SUV) गिफ्ट केली आहे. रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम मामिलपल्ले यांनी बॉक्सर मेरी कोमला कायगर एसयूव्हीच्या चाव्या दिल्या आणि राष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. (Renault Gifts The Kiger Subcompact SUV To Tokyo Olympics 2020 Flagbearer MC Mary Kom)

नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये शायनी विल्सन आणि अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर मेरी कॉम ही भारताची ध्वजवाहक बनणारी तिसरी महिला खेळाडू आहे. देशाची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी ही एसयूव्ही अनुभवी बॉक्सरला भेट म्हणून देण्यात आली आहे. तिने बॉक्सिंग रिंगमध्ये आणि रिंगच्याबाहेरदेखील स्वतःचं मोठेपण सिद्ध केलं आहे. फ्रेंच ऑटोमेकरने अलीकडेच टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या रवी कुमार दहिया, बजरंग पुनिया आणि मीराबाई चानू यांना कायगर एसयूव्ही सुपूर्द केली आहे.

कशी आहे Renault Kiger?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे.

बेस्ट एसयूव्ही?

या गाडीमधील इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, 8 स्पीकर साउंड सिस्टम, फ्लोटिंग टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग पॅड, सिलेक्टिव ड्राइव्ह मोड, प्रीमियम क्वालिटी सीट्स, प्लास्टिक कवर्ड दरवाजे, फिलिप्स एयर प्यूरीफायर, रियर एसी वेंट्स, 405 लीटर बूट स्पेससारख्या अनेक फीचर्समुळे ही कार बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. त्यामुळेच जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची कंपनी Renault ने आज कायगर (Kiger) ही एसयूव्ही बाजारात सादर केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.45 लाख रुपये आहे. याआधी Nissan कंपनीची Magnite ही एसयूव्ही नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault ची Kiger सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरू शकते.

दमदार इंजिन

रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करु शकतं. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा असेल. AMT सह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. रेनॉ कायगरमध्ये मल्टीसेंस ड्राइव्ह मोड फीचर देण्यात आलं आहे. ही कार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडवर चालवता येईल.

Renault Kiger ही कार कंपनीने एकूण 4 वेरिएंटमध्ये सादर केली आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ मॉडलचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला रेनॉ कायगरच्या सर्व वेरियंट्सच्या किंमतीबाबतची माहिती देणार आहोत. जेणेकरुन त्यापैकी कोणतं वेरियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे तुम्ही ठरवू शकाल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कारची निवड करु शकाल.

रेनॉ कायगरच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती

  • RXE 1.0L ENERGY MT – ₹5,45,000
  •  RXE 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹5,65,000
  •  RXL 1.0L ENERGY MT – ₹6,32,000
  •  RXL 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹6,52,000
  •  RXT 1.0L ENERGY MT – ₹6,80,000
  •  RXL EASY-R AMT 1.0L ENERGY – ₹6,82,000
  •  RXT 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹7,00,000
  •  RXL EASY-R AMT 1.0L ENERGY DUAL TONE – ₹7,02,000
  •  RXT EASY-R AMT 1.0L ENERGY – ₹7,30,000
  •  RXL 1.0L TURBO MT – ₹7,42,000
  •  RXT EASY-R AMT 1.0L ENERGY DUAL TONE – ₹7,50,000
  •  RXL 1.0L TURBO MT DUAL TONE – ₹7,62,000
  •  RXZ 1.0L ENERGY MT – ₹7,69,000
  •  RXZ 1.0L ENERGY MT DUAL TONE – ₹7,89,000
  •  RXT 1.0L TURBO MT – ₹7,90,000
  •  RXT 1.0L TURBO MT DUAL TONE – ₹8,10,000
  •  RXZ EASY-R AMT 1.0L ENERGY –  ₹8,19,000
  •  RXZ EASY-R AMT 1.0L ENERGY DUAL TONE – ₹8,39,000
  •  RXT X-TRONIC (CVT) 1.0L TURBO –  ₹8,60,000
  •  RXZ 1.0L TURBO MT – ₹8,79,000
  •  RXT X-TRONIC (CVT) 1.0L TURBO DUAL TONE – ₹8,80,000
  •  RXZ 1.0L TURBO MT DUAL TONE – ₹8,99,000
  •  RXZ X-TRONIC (CVT) 1.0L TURBO – ₹9,55,000
  •  RXZ X-TRONIC (CVT) 1.0L TURBO DUAL TONE – ₹9,75,000

(वर दिलेल्या सर्व किंमती एक्स शोरूम नवी मुंबई)

इतर बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

(Renault Gifts The Kiger Subcompact SUV To Tokyo Olympics 2020 Flagbearer MC Mary Kom)

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.