मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 7:46 PM

मुंबई : “पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (E.V.) ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील पर्यावरण पूरक बाबींचा जास्तीत-जास्त वापर करावा,” असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. (5 new electric vehicles in Mumbai Municipal Corporation’s fleet in Aditya Thackeray’s presence)

याच कार्यक्रमादरम्यान ‘व्हिजन – 2030’ अंतर्गत स्वच्छ मुंबईसाठी नागरिकांच्या भावना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे ऑनलाईन सर्वेक्षणाचा प्रारंभ देखील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात देखील नागरिकांनी सहभाग नोंदवावा व आपली मते आवर्जून मांडावीत, असेही आवाहन या निमित्ताने ठाकरे यांनी केले आहे.

या शुभारंभ कार्यक्रमास राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सचिव अशोक शिनगारे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे, उपआयुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

मनपाच्या ताफ्यात समावेश झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांबाबत

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सध्या 966 वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल यासारख्या खनिज तेलावर चालणाऱ्या वाहनांसह सीएनजी सारख्या पर्यावरणपूरक वाहनांचाही समावेश आहे. याच ताफ्यामध्ये आजपासून 5 इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ‘टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेहिकल असे मॉडेल नाम असणाऱ्या सदर पाचही कार या केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत. ही वाहने ‘ड्राय-लीज’ पद्धतीने सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली असल्यामुळे सदर वाहनांसाठी दरमहा रुपये 27 हजार इतका खर्च असणार असून यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. सदर वाहनांमध्ये परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बनडायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.

स्वच्छ मुंबईविषयक ऑनलाईन सर्वेक्षण

सर्व समावेशक दृष्टिकोनातून ‘व्हिजन 2030’ तयार करणे हे मुंबई महापालिकेने सुनिश्चित केलेले लक्ष्य आहे. ‘स्वच्छ मुंबई’ विषयक नागरिकांच्या भावना व मते जाणून घेण्यासाठी आजपासून ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भविष्यातील गरजांच्या दृष्टीकोनातून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य समस्यांवर मात करण्यासह मुंबई महापालिका आपल्या साधनांचा व उपलब्ध जागेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करणार आहे. त्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तरी या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि ‘व्हिजन 2030’ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सहभागात्मक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यास मदत करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

या ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी “https://mcgm-citizen-survey.cloudstrats.com” या संकेतस्थळावरील प्रश्नांची उत्तरे देऊन सदर सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

इतर बातम्या

बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ; नारायण राणे कडाडले

(5 new electric vehicles in Mumbai Municipal Corporation’s fleet in Aditya Thackeray’s presence)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.