रोज फक्त बिस्कीट खायचा, अचानक झाला मृत्यू ; डॉक्टरांनाही कळलं नाही कारण

एका सात वर्षांच्या मुलाला ऑटिझमचा त्रास होता, पण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूचं खरं कारण काही वेगळचं होतं, ते समजल्यानतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे ...

रोज फक्त बिस्कीट खायचा, अचानक झाला मृत्यू ; डॉक्टरांनाही कळलं नाही कारण
| Updated on: Jan 15, 2024 | 12:28 PM

नवी दिल्ली | 15 जानेवारी 2024 : या जगात काहीही होऊ शकतं. एका सात वर्षांच्या मुलाला ऑटिझमचा त्रास होता, पण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूचं खरं कारण काही वेगळचं होतं, ते समजल्यानतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे तो गंभीररित्या कुपोषित होता. आणि खाण्याशी संबंधित असलेल्या एका विकारामुळे त्याचा मृत्यू झाला. पण तो विकार कोणालाच ओळखता आला नाही, त्यामुळेच तो मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचला. ही खळबळजनक घटना इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या अल्फी अँथनी निकोल्ससोबत घडली, त्याला बोलता येत नव्हते. एखाद्या मुलाकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा मृत्यू रोखण्यास कसे अपयश आले, याचेच हे एक उदाहरण आहे.

या मुलाला असलेली समस्या लक्षात आली नाही असं नव्हतं. खरंतर, अल्फीची आई ल्युसी मॅरिसन याआधीच त्याला अनेकदा हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या, कारण त्याच्यासोबत काहीतरी चुकीच घडतंय असं तिला वाटत होतंच. पण डॉक्टरांना तिच्या समस्येचे निदान करता आले नाही किंवा ते मूल गंभीर कुपोषित असल्याचेही त्यांना कळू शकले नाही. त्याला होणारा त्रास, हे सर्व ऑटिझममुळे होत असल्याचे लुसीला सांगण्यात आले. मात्र त्याच्या मृत्यूनंतरच खरं कारण उघड झालं, खरंतर अल्फी हा Avoidant/Restrictive Food Intake Disorder (ARFID) मुळे ग्रस्त होता, जो ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये सामान्य आहे. पण तरी डॉक्टरांना ते समजू शकलं नाही. त्यामुळेच रुग्णालयाने अल्फीच्या कुटुंबीयांची माफीही मागितली होती. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात अस्फीचा आहार चांगला होता, पण शाळेत गेल्यावर तो फक्त काही बिस्किटे खात असे आणि थोडंच पाणी प्यायचा.

या प्रकरणात, न्यायालयात सुनावणी झाल्यावर असं लक्षात आलं की, शाळेतील नर्सने अल्फीकडे लक्ष दिलं नाही किंवा तो किती आणि काय खातोय हेही समजून घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. शेवटी त्याला, फूड क्लिनिकमध्ये स्पीच आणि लँग्वेज टीमकडे पाठविण्यात आले होते, तिथे त्याची तपासणी झाली. पण त्याच्या शरीरात पाण्याची कमी आहे, एवढंच त्यात आढलून आलं. झोपणं आणि इतर कामांसाठी अल्फीला मदत मिळाली, पण त्याच्या खाण्यापिण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाबी. एवढंच नव्हे तर त्याचं वजनही ठीकठाक प्रमाणात नव्हतं, त्यानमतर त्याचं वजन कमीच होत गेलं. एल्फीच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिने या विषयावर बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला पण तिचं कोणीच ऐकून घेतलं नाही.

मुलाxबाबत जागरुकता निर्माण काम करत्ये अल्फीची आई

अल्फीवर त्याच्या कुटुंबाचे प्रेम नव्हते किंवा त्याची काळजी घेण्यात कुचराई झाली, असं काही घडल नाही. पण त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली. अल्फीच्या छातीची तीन हाडे तुटली होती जी त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर CPR दिल्याने झाली होती. हे प्रकरण इंग्लंडमधील आहे आणि या विकसित देशात कुपोषणामुळे मुलाचा मृत्यू होणे ही खरोखरच धक्कादायक घटना आहे. गेल्या दोन वर्षांपासून अल्फीची आई लोकांमध्ये मुलांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे, जेणेकरून इतर कोणत्याही मुलासोबत असे घडू नये.