Saif Gaddafi : हुकूमशाहा मुअम्मर गद्दाफीच्या लेकाची क्रूर हत्या, चार जण आले अन्…जगात खळबळ!

लिबियाचा हुकूमशाहा मुअम्मर गद्दाफी याचे पुत्र सैफ गद्दाफी यांची थेट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राहत्या घरी बागेत बकलेले असताना चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Saif Gaddafi : हुकूमशाहा मुअम्मर गद्दाफीच्या लेकाची क्रूर हत्या, चार जण आले अन्...जगात खळबळ!
saif al gaddafi murder
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 04, 2026 | 9:26 PM

Saif Gaddafi Murder : लिबिया देशाचा माजी हुकूमशाहा मुअम्मर गद्दाफी याचे पुत्र सैफ अल इस्लाम गद्दाफी यांची त्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल आहे. अज्ञात चार लोकांनी गोळीबार केल्याने त्यांचा यात मृत्यू झाला. मुअम्मर गद्दाफी याला लिबियाचा क्रूर हुकूमशाहा म्हणून ओळखले जाते. त्याची 20 ऑक्टोबर 2011 रोजी हत्या करण्यात आली होती. लोकांनी पकडून त्याची हत्या केली होती. आता गद्दाफी याचे पुत्र सैफ गद्दाफी यांचीही हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सैफ गद्दाफी निवडणूक लढवण्याच्या होते तयारीत

मिळालेल्या माहितीनुसार सैफ अल इस्लाम गद्दाफी त्यांच्या राहत्या घरी बागेत बसलेले होते. त्याच वेळी अचानक चार हल्लेखोर आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार करून हल्लेखोर लगेच पळून गेले. सैफ गद्दाफी हे मुअम्मर गद्दाफी याचे उत्तराधिकारी मानले जायचे. सैफ गद्दाफी यांनी साधारण दशकभर तुरुंगवास भोगलेला आहे. सोबतच अनेक दिवस अज्ञातवासात राहिल्यानंतर ते लिबियाच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. परंतु त्याआधीच त्यांची हत्या झाली.

गद्दाफी जगातील ताकदवान नेत्यांपैकी एक

सैफ गद्दाफी हे कोणत्याही अधिकृत पदावर नव्हते. मुअम्मर गद्दाफी याने साधारण चार दशकं लिबियावर शासन केले होते. त्या काळात गद्दाफी हा जगातील सर्वाधिक ताकदवान नेत्यांपैकी एक होता. परंतु बंड झाल्यानंतर गद्दाफी याची हत्या करण्यात आली होती. आता सैफ गद्दाफी यांचीही हत्या झाली आहे.

वडिलांची हत्या झाल्यानंतर दशकभर कैद आणि अज्ञातवास

लिबिया हा तेलसमृद्ध देश आहे. 2011 साली मुअम्मर गद्दाफी याची सत्ता गेली. त्यानंतर साधारण एक दशक सैफ गद्दाफी एका डोंगरी भागात असलेल्या शहरात दशकभर कैदेत होते. त्या काळात ते अज्ञातवासातच होते. आता त्यांची हत्या झाल्याने लिबियामधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्येची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. परंतु चेहरा झाकून आलेल्या चार हल्लेखोरांनी थेट गोळीबार केल्याने यामागे नेमका कोणाचा हात असावा? असा सवाल उपस्तित केला जातोय.