मित्र मित्र म्हणत डोक्यावर घेतले, आता थेट दाखवली जागा, अमेरिकेचा पाकिस्तानला दणका..

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी निघालेला पाकिस्तान चांगलाच फसला आहे. थेट त्यांच्याच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. आता अमेरिका पाकिस्तानला मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे.

मित्र मित्र म्हणत डोक्यावर घेतले, आता थेट दाखवली जागा, अमेरिकेचा पाकिस्तानला दणका..
Pakistan and America
| Updated on: May 27, 2026 | 8:47 AM

इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करायला निघालेला पाकिस्तानच आता अडचणीत सापडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केल्याने अनेक देशांनी भुवया उंचावल्या. आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या किती जवळ आहोत, याची दिखावेगिरी जोरदारपणे पाकिस्तानने केली. आता  डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे सहकारी असलेले सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी पाकिस्तानला मोठा दणका दिला. लिंडसे ग्रॅहम यांनी पाकिस्तानच्या तटस्थतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इस्लामाबाद इस्त्रायलप्रती विरोध करत आहे. हेच नाही तर त्यांना पाकिस्तानला समस्याप्रधान थेट म्हणून टाकले. पाकिस्तान सध्याच्या घडीला चांगलाच कोडींत सापडल्याचे बघायला मिळत आहे.  पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देशाच्या मुलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कराराला पाठिंबा देणार नसल्याचे विधान केले.

इस्लामाबादने थेट अब्राहम करारात सामील व्हावे, याकरिता डोनाल्ड ट्रम्प यांनी मागणी केली. तसा प्रस्तावही त्यांच्याकडून ठेवण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला रिपब्लिकन सिनेटरने विरोध केला. याबाबत थेट धक्कादायक विधान केले. इस्लामाबादने पहिल्यांदाच वॉशिंग्टन विरोधात अशाप्रकारची भूमिका घेतल्याने मोठा थयथयाट बघायला मिळत आहेत. लिंडसे ग्रॅहम यांनी इस्लामाबादवर आपल्या हवाई तळांवर इराणी लष्करी विमानांना दिल्याच्या आरोपांवरही भाष्य करत हे चिंताजनक असल्याचे म्हटले.

मध्यस्थी चर्चा आयोजित करण्यामधील त्यांच्या निःपक्षपातीपणाबद्दल गंभीर शंका निर्माण केली. आता अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण होताना दिसत आहे. पाकिस्तानला कधीच अमेरिकेसोबत पंगा घेणे परवडणारे नाही. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले की, मला काही दिवसांपासून स्पष्ट झाले की, मध्यस्थी म्हणून पाकिस्तानच एक मोठी समस्या आहे. त्यांचा इस्त्रायलबद्दल जुना द्वेष आहे.

लिंडसे ग्रॅहम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट

हे नक्कीच आहे की, इराणी लष्करी विमाने पाकिस्तानी हवाई तळांवर तैनात केली जात आहेत. एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून इस्त्रायलविरोधात विधाने केली जात आहेत, ती खरोखरच चिंताजनक आहेत. पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत लिंडसे ग्रॅहम यांनी इस्त्रायलबाबतच्या इस्लामाबादच्या भावनांबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली. अब्राहम करारात सामील होण्याच्या ट्रम्प यांच्या आवाहनावरील आपल्या अधिकृत भूमिकेवर तात्काळ प्रतिसाद देण्याची देखील त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us