AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका नाहीच, रशियाच भारताचा खरा मित्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी साद घालूनही..

भारत आणि अमेरिका यांच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढउतार बघायला मिळाले. अमेरिकेने भला मोठा टॅरिफही अमेरिकेवर लावला. त्यानंतर आता 100 टक्के भारत अमेरिकेवर विश्वास ठेऊ शकतो, असे मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

अमेरिका नाहीच, रशियाच भारताचा खरा मित्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी साद घालूनही..
india russia donald trump
| Updated on: May 26, 2026 | 1:02 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार काैतुक केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मला खूप जास्त आवडतात, ते माझे मित्र आहेत. यासोबतच त्यांनी थेट म्हटले होते की, भारत अमेरिकेवर 100 टक्के विश्वास करू शकतो. ज्यावेळीही भारत काही अडचणीत असेल तर त्यांनी डोळे बंद करून भारत अमेरिकेची आठवण काढू शकतो. भारताच्या मागे अमेरिका 100 टक्के असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानाने अनेकांनी भुवया उंचावल्या. काही महिन्यांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावण्याचा मोठा निर्णय घेतला. यासोबतच व्यापार करारकरिता भारतावर मोठा दबाव टाकला. चीन हा रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश असूनही चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. या वाईट काळात भारताच्या मदतीला रशिया धावून आला.

अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो भारत दाैऱ्यावर आहेत. चार दिवसांच्या भारत दाैऱ्यावर ते आहेत. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोभाल आणि एस. जयशंकर यांची भेट घेतली.यादरम्यान अमेरिकी राजदूत सर्जियो गोर यांनी कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोन जोडून दिला. यावेळीच भारताबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.

भारत अमेरिकेवर 100 टक्के विश्वास करू शकतो, असेही त्यांनी यादरम्यान म्हटले. डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका यांच्यावर आता भारत विश्वास किती ठेवणार याबाबत चर्चा सुरू आहेत. कारण अमेरिकेने कोणताही विचार न करता भारतावर मोठा टॅरिफ लावत भारताला अडचणीत आणले. डोनाल्ड ट्रम्प जरी भारताबद्दल हे बोलत असतील तरीही अमेरिका फर्स्ट हे त्यांचे धोरण आहे. या धोरणाअंतर्गत ते काहीही निर्णय घेऊ शकतात.

H1 व्हिसाच्या मुद्द्यातही त्यांनी भारताला मोठा दणका दिला. ज्याचा परिणाम भारतीय जे अमेरिकेत राहतात, त्यांच्यावर झाला. त्यामुळे सध्याच्या परिस्थिती बघता भारत अमेरिकेवर विश्वास ठेवले, याबाबत शंका उपस्थित होते. यासोबतच भारताला मित्र म्हणत म्हणत अमेरिका पाकिस्तानला उभे करतो. पाकिस्तानचे पंतप्रधान सतत अमेरिकेच्या दाैऱ्यावर असतात. भारत रशियावर ज्यापद्धतीने विश्वास करतो, तसा विश्वास कधीच अमेरिकेवर करू शकत नाही. अमेरिकाला रशियाची जागाच हवी आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ