AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत हाहाकार! 24 तासाच्या आतच दुसरी मोठी गोळीबाराची घटना, तब्बल इतक्यांचा मृत्यु..

US Shooting News : इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेत खळबळ माजली आहे. एका मागून एक धक्कादायक घटना पुढे येत आहेत. काल मोठा गोळीबार अमेरिकेत झाला. ज्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते, तिथेच गोळीबार झाला. त्यानंतर धक्कादायक बातमी अमेरिकेतून येत आहे.

अमेरिकेत हाहाकार! 24 तासाच्या आतच दुसरी मोठी गोळीबाराची घटना, तब्बल इतक्यांचा मृत्यु..
Donald Trump
| Updated on: Apr 27, 2026 | 10:31 AM
Share

अमेरिकेत कालच झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच धक्कादायक घटना पुढे येत आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एक अत्यंत मोठा हल्ला झाला. एका गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टेक्सास रेंजर्स घटनेचा तपास करत आहेत, ज्यात एका पोलीस अधिकाऱ्याने संशयितावर गोळीबार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी ट्रेडविंड्स बुलेवार्डच्या 1100 ब्लॉकमधील ‘फेअर टू मिडलँड’जवळ कर्तव्यावर नसलेल्या पोलिस अधिकाऱ्याला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यामध्येच काल अत्यंत मोठा हल्ला व्हाईट हाऊसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात झाला. धक्कादायक बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या प्रशासनातील सर्व मुख्य अधिकारी आणि सर्व कॅबिनेट उपस्थित होते. हल्लेखोराने सर्व कट शांत डोक्याने रचला होता.

हल्लेखोराने यादीच तयार केली होती. डोनाल्ड ट्रम्प यामध्ये थोडक्यात बचावल्याचे सांगितले जाते. गोळीबार सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्थिती किती जास्त खतरनाक होती, व्हिडीओवरून पुढे येत आहे. हल्लेखोर अमेरिकन एजन्सीच्या ताब्यात आहे.

यादरम्यानच आता गोळीबाराची दुसरीही घटना पुढे येत आहे. हा गोळीबार एका बार पुढे झाल्याची माहिती आहे. या गोळीबारात दोन जण मृत्यु झाले तर दोन जण गंभीर जखमी आहेत. या प्रकरणात अधिकचा तपास केला जात आहे. मिळालेली अधिकची माहिती अशी की, कर्तव्यावर नसलेले पोलिस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बंदुकधारी व्यक्तीला रोखले आणि त्याच्यावर गोळी झाडली

जखमी संशयिताला मिडलँड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या गोळीबारात आणखीन दोन जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या गोळीबाराची घटना नक्की कोणत्या कारणाने घडली, याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. मात्र, काही तासाच्या आतच अमेरिकेतील ही गोळीबाराची दुसरी घटना असल्याने एकच मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात अधिकचा तपास पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. संशयित जखमीची स्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...