
सध्या पाकिस्तानचा सर्व कारभार असीम मुनीर यांनी ताब्यात घेतला आहे. सर्व सशस्त्र दलांवर त्यांचे नियंत्रण आहे. हेच नाही तर त्यांनी थेट पाकिस्तानमधील कायदा देखील बदलला असून त्यांच्याविरूद्ध कोर्टात कोणताही खटला दाखल करता येणार नाही. इम्रान खानच्या समर्थकांच्या आंदोलनांना चिरडून त्यांनी टाकले. ते आता पाकिस्तानचे फील्ड मार्शल बनले आहेत. असीम मुनीर यांच्याकडून जगाला देखील पाकिस्तानमध्ये सर्वकाही चांगले सुरू असल्याचे दाखवले जात असले तरीही पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. इम्रान खान यांच्यावर सरकारकडून जे अत्याचार सुरू आहेत, त्याच्याविरोधात पाकिस्तानमधील जनतेच्या मनात संताप आहे. असीम मुनीर यांनी सध्या अमेरिकेचे पाय पडले आहेत. स्वतंत्र सिंध राज्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हेच नाही तर एकाच मोठा संताप होऊन पाकिस्तानचे तब्बल 12 तुकडे होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
स्वतंत्र सिंध राज्याची मागणी करणारी जेय सिंध चळवळ आंदोलन करत आहे. बिलावल भुट्टो यांचा पक्ष असलेल्या पीपीपी पक्षानेही सिंधच्या विभाजनाच्या विरोधात आवाज उठवला. पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांनी सांगितले की, पाकिस्तानचे 12 प्रांतांमध्ये विभाजन केले जाईल, कारण लहान प्रांतांमुळे उत्तम प्रशासन शक्य होईल सध्या चार प्रांत आहेत आणि ते ही संख्या वाढवून बारा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
म्हणजेच थोडक्यात काय तर सध्याची पाकिस्तानची स्थिती बघता पाकिस्तानचे एक नाही तर तब्बल 12 तुकडे होणार आहेत. सिंधी, खैबर आणि बलुच लोकांमध्ये बंडाची ठिणगी तेव्हापासूनच पेटली, जेव्हा तेथील पंजाबच्या लोकांनी वन युनिट योजनेच्या नावाखाली त्यांची ओळखच पुसून टाकण्याचा एक व्यापक कार्यक्रम सुरू केला होता. बलुच लोकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे.
ज्याचे पूर्ण नाव नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे आणि आता त्याला खैबर पख्तूनख्वा म्हटले जाते. पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानसह होते. त्यानंतर 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश बनले, त्यामुळे पाकिस्तानचा फक्त हाच भाग शिल्लक राहिला. दुसऱ्या देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानमध्ये उद्रेक बघायला मिळत आहे. पाकिस्तानी लोक आक्रमक भूमिका घेत आहेत.