AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क मलेशियाच्या पंतप्रधानांनी गायलं किशोर कुमारांचे प्रसिद्ध गाणं, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित, Video Viral

मलेशियन पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी नवी दिल्ली दौऱ्यादरम्यान एक लोकप्रिय बॉलिवूड गाणे गायले. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो लगेचच व्हायरल झाला.

चक्क मलेशियाच्या पंतप्रधानांनी गायलं किशोर कुमारांचे प्रसिद्ध गाणं, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित, Video Viral
| Updated on: Sep 13, 2026 | 9:57 AM
Share

Brics Summit Update: ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सध्या अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी भारताच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मलेशियाचे पंतप्रधानही नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे प्रसिद्ध बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहेत. आपल्या दिल्ली दौऱ्याला एक विशेष सांस्कृतिक रंग देत, अन्वर इब्राहिम यांनी राजनैतिक कार्यासोबतच बॉलिवूडच्या सदाबहार गाण्यांचा आनंदही घेतला. १९६५ सालच्या ‘तीन देवियां’ चित्रपटातील किशोर कुमार यांचे प्रसिद्ध गाणे ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ गाऊन त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.

ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झालेल्या मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम अन्वर यांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असताना हे गाणे गायले. एस. डी. बर्मन यांचे सुमधुर संगीत आणि मजरूह सुलतानपुरी यांचे गीत असलेल्या हिंदी चित्रपटाद्दलचे त्यांचे प्रेम दिसून येते, जी आवड त्यांच्या राजनैतिक दौऱ्यांमध्ये अनेकदा दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आपल्या पूर्वीच्या राजनैतिक चर्चेदरम्यान भारतीय लोकप्रिय संस्कृतीबद्दल असेच प्रेम दर्शवत, अन्वर यांनी ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘बोले चुडिया’ या गाण्यावर आधारित एक अधिकृत व्हिडिओ मॉन्टेज शेअर केला.

मलेशियन नेते अन्वर यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहासाची प्रशंसा केली. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भू-राजकीय समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी आशाही व्यक्त केली. २०२२ मध्ये मलेशियाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून अन्वर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि पर्यटन सहकार्यासह अनेक करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली.

आपले कार्यक्रम सुरू ठेवत, अन्वर इब्राहिम यांनी १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा उल्लेख करत ते म्हणाले, “पाहा पंतप्रधान मोदी किती लोकप्रिय आहेत, मला त्यांच्या शुभेच्छा देणारे अनेक संदेश मिळाले.” मलेशियाने ब्रिक्स भागीदार देश म्हणून या उच्चस्तरीय संवादात भाग घेतला आणि जागतिक प्रशासन, शाश्वत विकास, व्यापार, गुंतवणूक आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

Follow Us
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय