भीषण आग, 44 लोकांचा मृत्यू, तब्बल 300 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू, अनेक अपार्टमेंट्स…

नुकताच मोठी आगीची घटना घडली असून बचावकार्य राबवले जात असून तब्बल 44 लोकांचा जीव आतापर्यंत गेला असून अजूनही काही लोक इमारतींमध्ये अडकल्याची शक्यता आहे. इमारती उंच असल्याने बचावकार्यास समस्या येत आहेत.

भीषण आग, 44 लोकांचा मृत्यू, तब्बल 300 जण बेपत्ता, बचावकार्य सुरू, अनेक अपार्टमेंट्स...
massive fire
| Updated on: Nov 27, 2025 | 7:31 AM

एक हैराण करणारी घटना घडली असून इमारतीला मोठी लागली. या आगीमध्ये तब्बल 44 लोकांचा जीव गेला. आगीची माहिती मिळताच प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले. मात्र, 44 निष्पाप लोकांचा जीव गेला. ही आग सात इमारतींमध्ये पसरल्याचे वृत्त आहे. या घटनेसंदर्भात तीन संशयितांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या आगीच्या घटनेचा तपास सुरू आहे. हाँगकाँगमधील तैपोतील अनेक बहुमजली इमारतींना ही आग लागली. आग वाऱ्यासारखी पसरली. ज्यावेळी आगीची घटना घडली, त्यावेळी लोक मोठ्या संख्येने घरात होते. लोकांना घरातून बाहेर पडण्याची साधी संधी देखील मिळाली नाही. स्थानिक माध्यमांनी अग्निशमन सेवा विभाग (FSD) च्या हवाल्याने सांगितले की, भीषण आगीमुळे अनेक लोक इमारतींमध्ये अडकले होते.

आगीचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते. एफएसडीने सांगितले की त्यांना बुधवारी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2025 दुपारी 2 च्या आसपास आगीची तक्रार मिळाली आणि दुपारी 3 वाजताच्या सुमारास त्यांना क्रमांक 4 अलार्म फायर घोषित केले. हा हाँगकाँगमधील सर्वात मोठ्या आगीच्या वेळी अलार्म वाजतो. व्हिडिओंमध्ये इमारतींमधून धुराचे लोट येत असल्याचे दिसून आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहरातील तैपो जिल्ह्यातील कॉम्प्लेक्सच्या बाहेर असलेल्या बाबूंमुळे आग पसरली. ही आग झपाट्याने वाढली. हेच नाही तर या आगीमध्ये 44 लोकांचा जीव गेला तर अजूनही 300 लोकांचा शोध घेतला जात आहे. सर्च ऑपरेशन सुरू असून प्रशासनाकडून मदत केली जात आहे. या आगीच्या घटनेने काही लोक घर सोडून पळाल्याचीही माहिती मिळत आहे.

हाँगकाँग सरकार आणि अग्निशमन सेवा विभागाने आगीच्या घटनेदरम्यान स्पष्ट केले की, अजूनही काही लोक इमारतींमध्ये अडकल्याची शक्यता आहे. धूर, उंची आणि अरुंद पायऱ्या यामुळे बचाव कार्य करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. आग विझविण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी 700 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी सतत काम करत आहेत. आग जरी दुपारी लागली असली तरीही रात्री उशीरापर्यंत ही आग विझली नव्हती. इमारतींची उंची जास्त असल्याने आग विझवण्याचे मोठे आव्हान आहे.