Meta Layoffs : टेक विश्वात खळबळ, मेटामध्ये हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार; मोठी नोकरपात होणार!

आता तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. मेटा कंपनी तब्बल 10 टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचे समोर आले आहे. तसा दावा केला जातोय. त्यामुळे आता काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Meta Layoffs : टेक विश्वात खळबळ, मेटामध्ये हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार; मोठी नोकरपात होणार!
meta layoffs
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2026 | 9:44 PM

Meta Layoffs : गेल्या चार ते पाच वर्षांत तत्रज्ञान जगात मोठे आणि अविश्वसनीय असे बदल झाले आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. याच विकासामुळे एकीकडे गेल्या चार ते पाच वर्षात लाखो नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. तर दुसरीकडे कृत्रिम बुद्धीमत्तेमुळेच आता टेक क्षेत्रात काम करणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडातर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून जगातील दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करत आहेत. असे असतानाच आता संपूर्ण जगात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. जगप्रसिद्ध असलेली मेटा ही कंपनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे.

कर्मचारी कपात 20 टक्क्यांपर्यंत वाढवली जाणार

एका रिपोर्टनुसार मेटा कंपनीत मे महिन्यात साधारण 10 टक्के कर्मचारी कपात केली जाणार आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून लवकरच साधारण 8000 कर्मचाऱ्यांना कमावरून काढून टाकले जाणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने होणारे काम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या धोरणानुसार सर्व गोष्टी जुळून आल्या तर लवकरच ही कर्मचारी कपात 20 टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. परंतु दुसरीकडे या वृत्ताला मेटाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मेटा कंपनी किंवा मेटाचे अधिकारी अशा कोणीही याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

वर्षभरात 3 लाखांपेक्षा जास्त लोकांची नोकरी जाणार

प्राथमिक माहितीनुसार मेटा या कंपनीत जगभरात 79000 कर्मचारी काम करतात. परंतु लवकरच यातील 16000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. 2026 सालानंतर टेक कंपन्यांत कर्मचारी कपात होण्याचे प्रमाण वाढले. एका रिपोर्टनुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच 80 हजारांपेक्षा जास्त नोकऱ्या गेल्या आहेत. हा आकडा वर्षभरात तीन लाखांच्याही पुढे जाण्याची भीती आहे.

दरम्यान, मेटा कंपनी लवकरच कर्मचारी कपात करणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर टेक विश्वात नोकरी करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भविष्यात नेमके काय होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us