ब्रिटनमध्ये 460 कोटी वर्षांपूर्वीचा ‘खजाना’, पृथ्वीपेक्षाही जुना, जीवसृष्टीची अनेक रहस्य समोर येण्याची शक्यता

| Updated on: Jul 23, 2021 | 3:52 PM

ब्रिटनमध्ये जीवसृष्टीची अनेक गुपितं उघड करणारा 460 कोटी वर्षांपूर्वीचा खजाना सापडलाय. पृथ्वीपेक्षाही जुन्या या खजान्याच्या अभ्यासातून आजपर्यंत न उलगडलेल्या कोड्यांची उत्तरं मिळू शकतात.

1 / 6

2 / 6
हा खजाना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अंतराळातून पृथ्वीवर पडलेला उल्कापात आहे. हा जुना दगड जवळपास 300 ग्रॅम वजनाचा आहे. तो इंग्लंडमधील ग्लोस्टशायरच्या एका गावात सापडला.

3 / 6
ईस्ट अँग्लियन एस्ट्रोफिजिकल रिसर्च ऑर्गेनायजेशनमध्ये (EAARO) एस्ट्रोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक डेरेक रॉबसन यांनी याचा शोध लावलाय. या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटी त्यांची टीम या उल्कापाताच्या शोधात निघाली होती.

4 / 6
हा उल्कापात 17.7 कोटी किलोमीटरचा प्रवास करुन पृथ्वीवर आलाय. त्याचं मूळ ठिकाण मंगळ किंवा ज्युपिटर असण्याची शक्यता आहे. संशोधकांना या उल्कापाताच्या प्रवासापेक्षा त्याचं वय शोधणं अधिक आवश्यक वाटत आहे. हा उल्कापात आपल्या सूर्यमंडलाच्या आधीचा असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. (EAARO)

5 / 6
EAARO ने सांगितलं की हा दगड थर्मल मेटाफोरफिजममधून गेलेला नाही. मंगळ किंवा अन्य ग्रहावरुन आलेला हा उल्कापात मोठ्या काळापासून येऊन येथे पडलेला आहे. ते अद्याप अस्पर्श आहे. (EAARO)

6 / 6
हा दगड ज्या घटकांपासून बनलाय तसा दगड याआधी कधीही मिळालेला नाही. यात अनेक प्रकारचे खनिजं आहेत. या उल्कापाताचा बहुतांश भाग हा ओलिविन आणि फायलोसिलिकेट्स सारख्या खनिजांपासून बनतात. (EAARO)