बांगलादेशातील राजकीय संकट समाप्त? समोर आली मोठी माहिती, आता मोहम्मद युनूस…

बांगलादेशच्याअंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे कोणत्याही क्षणी त्यांच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊ शकतात, असं म्हटलं जात होतं. पण आता नवी माहिती समोर आली आहे.

बांगलादेशातील राजकीय संकट समाप्त? समोर आली मोठी माहिती, आता मोहम्मद युनूस...
muhammad yunus
| Updated on: May 24, 2025 | 8:45 PM

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील राजकीय स्थिती चांगलीच ढासळत चालली आहे. याच कारणामुळे या देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र बागलादेशच्या राजधानीत पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. तसेच आगामी काळात सरकार निष्पक्ष निवडणूक, न्यायप्राणाली, तसेच अन्य सुधारणांसाठी आम्ही प्रयत्नीशील राहू, अशी ग्वाही या अंतरिम सरकारने दिली आहे.

मोहम्मद युनूस हेच अंतरिम सरकारच्या प्रमुखपदावर कायम

मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख आणि सल्लागार परिषदचेचे प्रमुख प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी नुकतेच एक बैठक बोलवली होती. या बैठकीत देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, प्रशासनातील आव्हान आदी विषयांवर गंभीर चर्चा झाली. याच बैठकीत मोहम्मद युनूस हेच अंतरिम सरकारच्या प्रमुखपदावर कायम राहतील, असे ठरवण्यात आले आहे.

अचानकपणे बैठकीचे आयोजन

ही बैठक संपल्यानंतर बांगलादेशच्या सल्लागार समितीने एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. ही बैठक राष्ट्रीय आर्थिक परिषदेनंतर शनिवारी राजधानी शेर ए बांगला नगरातील योजना आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. अचानकपणे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणूक, सुधारण तसेच न्याय यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असे या ट्विटमध्ये सांगण्यात आले.

देशातील कुहूमशाहाचे आगमन कोणत्याही…

देशातील सर्वसामान्य कामकाजावर नकारात्मक परिणाम पडत आहे. वेगवेगळ्या राजयकीय पक्षांकडून अनाकलनीय मागण्या केल्या जात आहेत. वेगवेगळी आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. अशा कामांमुळे देशात शंका निर्माण होत आहे. या सर्व अडचणी असूनही आमचे अंतरिम सरकार त्याच्यावरची जबाबदारी पार पाडत आहे, असे मोहम्मद युनूस यांनी या बैठकीत सांगितले. तसेच सल्लागार परिषदेने सर्व पक्षांना एकता राखण्याचे आगामी निवडणूक तसेच न्यायव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले आहे. देशातील कुहूमशाहाचे आगमन कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवे, असेही या सल्लागार परिषदेने आवाहन केले आहे.

दरम्यान, आता मोहम्मद युनूस हे आपल्या पदावर सध्यातरी कायम राहणार असून भविष्यात बांगलादेशमध्ये काय-काय घडामोडी घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.