AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकले मोहन भागवत यांचे फोटो, थोड्याच वेळात मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये संबोधन

Mohan Bhagwat New York : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत शनिवारी संध्याकाळी अमेरिकेतील भारतीय समुदायातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकले मोहन भागवत यांचे फोटो, थोड्याच वेळात मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये संबोधन
Mohan Bhagwat USA SpeechImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 29, 2026 | 9:25 PM
Share

अमेरिकेतली न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये (MSG) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत शनिवारी संध्याकाळी भारतीय समुदायातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्याआधी टाइम्स स्क्वेअरच्या मध्यभागी असलेल्या एका बिलबोर्डवर मोहन भागवत यांची छायाचित्रे झळकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्लोबल आउटरीच कार्यक्रमासाठी भागवत मंगळवारी अमेरिकेत पोहोचले. त्यांच्या या दौऱ्यात कॅनडा आणि ब्रिटनचाही समावेश आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये शनिवारी भागवत सुमारे 5 हजार लोकांना संबोधित करणार आहेत. ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ असे या कार्यक्रमाचे नाव असून, अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग (AHEAD) या संस्थेकडून त्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी या कार्यक्रमाचे वर्णन रक्षाबंधनाच्या विशेष सभेच्या रूपात केले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, सांस्कृतिक सादरीकरण आणि मुख्य भाषणाच्या माध्यमातून या कार्यक्रमात जागतिक एकता तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ या हिंदू तत्त्वज्ञानावर चर्चा केली जाणार आहे. ‘संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे’, असा या तत्त्वज्ञानाचा अर्थ आहे.

टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर भागवत यांची छायाचित्रे

मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी संध्याकाळी टाइम्स स्क्वेअरमधील एका प्रमुख बिलबोर्डवर ‘रिझॉल्व्ह, हार्मनी अँड डायलॉग’ या शीर्षकासह मोहन भागवत यांची छायाचित्रे झळकली. बिलबोर्डवर भागवत यांची छायाचित्रे दिसताच भारतीय-अमेरिकन समुदायातील अनेक सदस्यांनी टाइम्स स्क्वेअरमध्ये त्यासमोर फोटो काढले.

दरम्यान, मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोहन भागवत यांच्या नियोजित कार्यक्रमावर काही नागरी हक्क संघटनांनी टीका केली आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनीही या कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे. मात्र, हा ‘खासगी’ कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाकडे नसू शकतो, असेही ममदानी यांनी स्पष्ट केले.

इस्कॉनच्या संस्थापकांना श्रद्धांजली

अमेरिकेतील दौऱ्यात मोहन भागवत यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांशी, इंडियन-अमेरिकन व्यावसायिक आणि विविध समुदायांच्या नेत्यांशी बैठका व चर्चा केली. याशिवाय त्यांनी न्यूयॉर्कमधील भक्ती सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (ISKCON) चे संस्थापक आणि भारतीय आध्यात्मिक गुरू श्रील ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा