बॉयफ्रेंडचा नव्हता मूड, प्रेयसीने उगवला सूड!

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी: शेख लोकांची दुबई, सोन्या चांदिने मढलेली, तेलाच्या साठ्यांवर असलेली दुबई. या दुबईत काय घडतं, कुणाला काही कळत नाही. पण एक अशी घटना समोर आली आहे, जी पाहून ऐकून काळीज थक्क होईल. एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला. त्याच्या भावासोबत त्याचं अखेरचं बोलणं झालं. अचानक तो गायब झाला. त्याचवेळी महिलेच्या घरासोबत काम […]

बॉयफ्रेंडचा नव्हता मूड, प्रेयसीने उगवला सूड!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी: शेख लोकांची दुबई, सोन्या चांदिने मढलेली, तेलाच्या साठ्यांवर असलेली दुबई. या दुबईत काय घडतं, कुणाला काही कळत नाही. पण एक अशी घटना समोर आली आहे, जी पाहून ऐकून काळीज थक्क होईल. एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला. त्याच्या भावासोबत त्याचं अखेरचं बोलणं झालं. अचानक तो गायब झाला. त्याचवेळी महिलेच्या घरासोबत काम करणाऱ्या काही मजुरांचं अचानक पोट खराब झालं. घटनेच्या दिवशी तिला याच प्रेयसीने बिर्याणी बनवून खाऊ घालती होती. मग त्या तरुणासोबत काय झालं, बिर्याणीचा आणि त्या तरुणाच्या गायब होण्याचा काय संबंध होता… ती बिर्याणी कुणाची होती, त्या बिर्याणीत असं काय होतं? या संपूर्ण थराराची ही कहाणी –

तुकड्यांनी बनवली ‘बॉयफ्रेंड बिर्याणी‘ ! संयुक्त अरब अमिरातमधील अल अइन शहर. गर्भ श्रीमंतांच्या या शहरात एक मन सुन्न करणारा प्रकार घडला. हा प्रकार इतका विचित्र आहे, की ऐकूण काळीज थक्क होतं. एका महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलावलं होतं, त्यानंतर तो तरुण अचानक बेपत्ता झाला. त्याच दिवशी महिलेच्या घरासमोर काम करणारे काही पाकिस्तानी कामगारही आजारी पडले. जो तरुण बेपत्ता झाला होता, त्याचा कुठेही ठाव-ठिकाणा सापडत नव्हता.

अखेर तरुणाच्या भावाने त्याच्या प्रेयसीचं घर गाठलं. इथे वॉश बेसिनमध्ये त्याला असं काही सापडलं, की ज्याने एका खतरनाक हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा केला.

बेपत्ता तरुणाचा भाऊ त्याचा शोध घेण्यासाठी आरोपी प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या भावाबाबत तिला विचारणा केली. त्यावेळी प्रेयसीने त्याच्याबाबत काहीही माहिती नाही, असा कांगावा केला,.. पण, तिच्या घरामधील मिक्सर-ब्लेंडरमध्ये मृत तरुणाच्या भावाला मानवी दात अडकलेला दिसला आणि त्याचा संशय बळावला. त्याने थेट पोलीस ठाणं गाठलं आणि संबंधित प्रकार सांगितला. पोलिसांनीही घटनेची चौकशी सुरू केली आणि दाताची डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यानंतर तो दात मृत तरुणाचाच असल्याचं स्पष्ट झालं. पण पोलिसांकडे मृतदेह नसल्यानं अखेर हत्या कुणी केली, आणि तरुणासोबत काय घडलं, असा सवाल निर्माण झाला. त्यांनी 30 वर्षीय प्रेयसीला ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आणि अखेर तिने आपला गुन्हा कबूल केला.

घटनेच्या दिवशी काय झालं ? मृत तरुण खुनी प्रेयसीचा पहिला प्रियकर होता. मोराक्को इथे दुसऱ्या मुलीशी विवाह करण्याचं त्याने प्रेयसीला सांगितलं होतं. याचाच बदला घेण्यासाठी मुलीने त्याला बिर्याणीसाठी आमंत्रण दिलं. घरात आधी त्याची धारदार शस्त्राने हत्या केली, हत्येनंतर प्रियकराच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे केले. मृतदेहाच्या तुकड्यांची बिर्याणी शिजवून, बांधकाम कामगारांना खाऊ घातली. खुनाचे सगळे पुरावे मिटवून टाकले.

जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, तेव्हा पाकिस्तानी कामगारांनी बिर्याणी खाऊन त्यांचं पोट खराब झाल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे खुनी प्रेयसी काही केल्या गुन्हा कबूल करत नव्हती. खोटी माहिती देत तिने पोलिसांची दिशाभूल केली. दुसऱ्या महिलेशी लग्न करणार असल्याचं समजताच प्रियकराला घरातून लाथ मारुन हाकलल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर मी परत त्याला पाहिलंच नाही असं ती वारंवार सांगत होती. पण एका दातामुळे तीचं बिंग फुटलं, खुनी चेहरा समोर आला, आणि ही खुनशी प्रेयसी तुरुंगात पोहोचली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.