Nepal Earthquake: नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, 5.1 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले

नेपाळमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के जाणविले. काठमांडूच्या जवळ झालेल्या या भूकंपाची तीव्रता मोठी होती.

Nepal Earthquake: नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, 5.1 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले
राजधानी दिल्लीही भूकंपाने हादरली
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 19, 2022 | 5:09 PM

काठमांडू, नेपाळमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake In Nepal) धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, काठमांडूच्या (Kathmandu) पूर्वेस 53 किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. दुपारी 2.52 मिनिटांनी हा भूकंप जाणवला. आज आलेल्या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी होती. अद्याप या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. याआधी जुलै महिन्याच्या सुरुवातीला नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी मोजण्यात आली होती. त्यावेळी काठमांडूपासून 147 किमी दूर भूकंपामुळे मोठे नुकसान झाले होते. नेपाळच्या वेळेनुसार सकाळी 8.13 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. खोटांग जिल्ह्यातील मार्तिम बिर्टा नावाच्या ठिकाणी हे धक्के जाणवल्याचे एनईएमआरसीने म्हटले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळच्या 10 किमी त्रिज्येमध्ये मोजण्यात आला.

नुकताच लडाखमध्ये झाला भूकंप

यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी लडाख केंद्रशासित प्रदेशात  4.2 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळी 8.07 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरच्या लेह पट्ट्यातून 135 किमी ईशान्येला नोंदवला गेला. या घटनेत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू 34.92 अंश उत्तर अक्षांश आणि 78.72 अंश पूर्व रेखांशावर जमिनीच्या खाली 10 किमी खोलीवर होता. केंद्रशासित प्रदेशातील हा हिमालयी प्रदेश भूकंपासाठी संवेदनशील मानला जातो.